Header Ads Widget

गुरूदेव रुग्णालयाकडून पाच हजार बाल रक्षा किटचे मोफत वाटप होणार

    * प्रजासत्ताक दिनापासून नोंदणीला सुरुवात
    * भारतातील सर्वोत्तम १० रुग्णालयात श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाची निवड
    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    गुरुकुंज मोझरी/वार्ताहर : आझादी का अमृत महोत्सव”, “हर दिन हर घर आयुर्वेद”, “जन संदेश, जन भागीदारी जन आंदोलन”अंतर्गत श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान,आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने “बाल रक्षा किट” चे मोफत वितरणाचा शुभारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालय येथे प्रजासत्ताकदिनापासून होणार आहे.26 जानेवारी पासून नोंदणीला सुरुवात होऊन.१ ते ५ फेब्रुवारी पर्यंत बाल रक्षा किट शून्य ते १६ वर्ष वयापर्यंतच्या बालकांना मोफत मिळणार आहे.

    “बाल रक्षा किट” हे बालकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत करते ज्यामुळे विविध विषानुजान्य आजार होत नाहीत, वारंवार होणारे सर्दी, खोकला या आजारांचा प्रादुर्भाव कमी होतो व पचनशक्ती सुधारते. “बाल रक्षा किट” मध्ये च्यवनप्राश, आयुष बाल क्वाथ, संशमनी वटी, अणु तैल आहे. यांचा समावेश आहे.बाल रक्षा किट आयुष मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान,नवी दिल्ली येथील बालरोग विभगाद्वारे तयार करण्यात आली आहे.

    भारतातील सर्वोत्तम १० रुग्णालयात याचे मोफत वाटप होत असून त्यात श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाची निवड झाली आहे.या सेवेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आपल्या बालकांची नोंदणी करून जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळचे आरोग्य विश्वस्थ प्रमुख डॉ. पी. पी. पाळेकर, श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर खारोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज सांगळे व बालरोग विभाग प्रमुख डॉ. अमोल पाटील यांनी केले आहे.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या