Header Ads Widget

प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे यांची विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीवर अविरोध निवड

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांमधून एक शिक्षक विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीवर नामनिर्देशित करावा लागतो. नुटाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व सिनेटच्या निवडणुकीत प्रचंड यश संपादन करणारे प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे यांना सिनेटने एकमताने विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीवर नुकतेच निवडले आहे. 30 जानेवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. 31 जानेवारीला अर्जांची छाननी केली असता डॉ. मुंद्रे यांचा एकच अर्ज या समितीसाठी प्राप्त झाला होता. त्यामुळे विद्यापीठाने त्यांची निवड घोषित केली.

  विद्यापीठाची तक्रार निवारण समिती ही सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जाते. कुलगुरूने नामनिर्देशित केलेला एक अधिष्ठाता, कुलपतीने व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशित केलेली व्यक्ती, कुलसचिव, अधिसभेने आपल्या सदस्यांमधून नामनिर्देशित केलेला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्गातील एक अध्यापक आणि एक अध्यापकेत्तर कर्मचारी, त्याचप्रमाणे या समितीचे सदस्य-सचिव हे विद्यापीठाचे विधी अधिकारी असतात. प्रत्येक विद्यापीठामध्ये राज्य शासन केंद्र सरकार किंवा स्थानिक प्राधिकरण यांनी व्यवस्थापन केलेल्या व चालविलेल्या संस्थांव्यतिरिक्त, विद्यापीठांचे संलग्न व स्वायत्त महाविद्यालयांचे आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांचे अध्यापक व इतर कर्मचारी यांच्या, राज्य शासन व त्यांचे अधिकारी यांच्याविरुद्धच्या तक्रारी व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या आणि विद्यापीठाच्या व महाविद्यालय न्यायाधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत, अशा तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे.

  तक्रार निवारण समिती व्यवहारी असेल तेथवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत कायद्यानुसार तक्रारीची सुनावणी, समझोता करील व त्यावर निर्णय देईल. दोन्ही पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर न्यायाधीकरणाच्या अधिकारक्षेत्रात नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसंबंधीची गाऱ्हाणी किंवा तक्रारी विचारार्थ स्वीकारणे व त्यावर निर्णय देणे हे तक्रार निवारण समितीसाठी कायदेशीर असेल.

  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेने अविरोध डॉ. मुंद्रे यांची निवड केल्यामुळे त्यांनी अधिसभेच्या सर्व सदस्यांचे हार्दिक आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या