- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, अभ्यासक निशिकांत भालेराव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शुक्रवार दि. 13 जानेवारी, शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीत श्री. भालेराव यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्ज्वल्य इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर हैद्राबाद संस्थानाचा कारभार, कार्यपद्धती, तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या