Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल; नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शहरात गुरुवार, दि. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतुक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश निर्गमित केला आहे. यानुसार, गुरुवार, दि. 26 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारचे मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

    तसेच शहरातील गाडगेनगर समाधीपासून ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडिअमकडे येणारा उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन गुरुवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावतो आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहे.

    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल , असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सागर पाटील यांनी कळविले आहे.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code