Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार देवेंद्र भुयार विधिमंडळात आक्रमक

  * फळ पीक विम्यासह सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याची मागणी
  * मोर्शी वरूड तालुक्यातील मंजूर विकास कमावरील स्थगित उठवा-आमदार देवेंद्र भुयार
  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी विधीमंडळात पीकविम्यासह, आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, सिंचनाच्या प्रश्नावर सभागृहात जोरदार बाजू मांडून शेतकऱ्यांसाठी पक्ष राजकारण बाजूला ठेवून रद्द केलेल्या कामांना मंजूरी द्यावी अशी आग्रही मागणी केली. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मतदार संघातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला.

  मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोर्शी वरुड मतदार संघातील विकासासाठी कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर करून घेतली होती. मात्र, शिंदे सरकार आल्यानंतर मोर्शी वरुड मतदार संघातील ४२१ कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थागिती मिळाल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. सरकार बदलल्यानंतर मतदार संघातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली. परंतु हि सर्व विकास कामे लोकहिताचे असून मतदार संघातील नागरिकांना लाभदायी ठरणारी आहे. त्यामुळे या विकास कामांवरील स्थगिती काढून मोर्शी विधानसभा मतदार संघाचे विकासाकरिता भरीव निधी देण्याची लोकहितकारी मागणी आमदार देवेंद्र हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून मतदार संघातील विविध समस्या सोडविण्याची मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये रेटून धरली.

  वरूड तालुक्यातील पांढरी मध्यम प्रकल्पाचे काम संबधित कंत्राटदाराकडुन पुर्ण न करता अर्धवट प्रमाणात काम सोडून कंत्राटदाराने काम बंद केले आहे, सदर सदर कामाचे देयके मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली अस मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून तत्काळ प्रकल्प पूर्ण करून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून शासन निर्णय क्र.जसयो प्र मा/ प्रक्र ६०००/९५०, दिनांक ९ मे २०२२ अन्वये वरुड व मोर्शी तालुक्यात ०० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या ३९ कोल्हापुरी बंधारे द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मोर्शी वरूड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादक असलेले हे क्षेत्र कायम अति शोषित असल्यामुळे भूजल पातळी खालावलेल्या वरुड व मोर्शी या दोन्ही तालुक्यातील ३९ कोल्हापुरी बंधारे द्वारयुक्त सिमेंट बंधारे निर्माण होणे गरजेचे असताना शासनाने मोर्शी वरूड तालुक्यातील विकासकामांवर घातलेले निर्बंध उठविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

  अमरावती जिल्ह्यामध्ये आंबिया बहार संत्रा फळ पीक विमा अचानक तीन पटीने महागल्याने आधीच अस्मानी, सुलतानी संकटाने भरडलेल्या, मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांच्या संकटात महागलेल्या विम्याची आणखी नवी भर पडली असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन शासनाने विमा हप्ता कमी करावा यासह आदी विषयांची मांडणी करून मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिवेशनामध्ये रेटून धरली.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code