Header Ads Widget

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; प्रशासन सुसज्ज

  *अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक
  *निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पत्रकार परिषद
  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी मतदान दि. 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे सांगितले.

  विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते.

  डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारायला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त नाही. नामनिर्देशन पत्रे दि. 12 जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी दि. 13 जानेवारीला होईल. उमेदवारी अर्ज दि. 16 जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया दि. 4 फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.

  मतदार संख्या

  अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात 1 लाख 20 हजार 944 पुरूष, 64 हजार 906 महिला व इतर 75 अशा एकूण 1 लाख 85 हजार 925 मतदारांची नोंदणी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात 33 हजार 236 पुरूष, 23 हजार 329 महिला, इतर 64 असे एकूण 56 हजार 629 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात 27 हजार 943 पुरूष, 16 हजार 552 महिला व 11 इतर असे एकूण 44 हजार 506, तसेच बुलडाणा जिल्ह्यात 26 हजार 161 पुरूष, 10 हजार 336 महिला (इतर शून्य) असे एकूण 36 हजार 497 मतदार नोंदणी आहे.

  वाशिम जिल्ह्यात 11 हजार 78 पुरूष, 3 हजार 966 महिला (इतर शून्य) असे एकूण 15 हजार 44 आणि यवतमाळ जिल्ह्यात 22 हजार 526 पुरूष, 10 हजार 723 महिला (इतर शून्य) एकूण 33 हजार 249 मतदारांची नोंदणी आहे.

  मतदान केंद्रे

  विभागात संभाव्य 262 मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलडाणा जिल्ह्यात 52, वाशिम जिल्ह्यात 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्रे असतील.

  निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिका-यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 288, मतदान अधिकारी म्हणून 1 हजार 153 व सूक्ष्म निरीक्षक म्हणून 289 अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात येत आहे.

  निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल जेणेकरून मतदान बाद होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

  दरम्यान, निवडणूक निर्णय अधिका-यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणूकविषयक विविध बाबींची माहिती दिली, तसेच त्यांचे शंकानिरसन केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

   --------------

   तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

   --------------------

   आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

   -बंडूकुमार धवणे
   संपादक गौरव प्रकाशन
   --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या