Header Ads Widget

अंजनगावात आजपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे आयोजन

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) : ३ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत अंजनगाव सुर्जी तालुक्यात जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे.

  ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी वनसेना भवन येथे दशरात्रोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.दुपारी २ वाजता महिलांची भव्य बाईक रॅली अंजनगाव शहरातून निघणार आहे.तसेच चार तारखेला सावित्री- जिजाऊ दशरात्रौत्सवाची आवश्यकता का ? या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.पाच जानेवारीला "शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह" आणि सायंकाळी भंडारज येथे व्याख्यान होणार आहे.

  सहा जानेवारीला पत्रकार दिनाचे आयोजन केले असून "सद्यस्थितीत पत्रकारिता आणि लोकशाही" या विषयावर चर्चासत्र होणार आहे.सात जानेवारीला जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहेकरे ,उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बळवंत वानखडे व संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर उपस्थित राहणार आहे.आठ तारखेला पांढरी खानमपूर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.९ जानेवारीला दहिगाव रेचा येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. तसेच १० जानेवारीला समारोपीय कार्यक्रम असून दुपारी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व सायंकाळी दीपोत्सवाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष सीमा बोके व तालुकाध्यक्ष प्रिया गायगोले यांनी केले आहे.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या