Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

*राष्ट्रीय मतदारदिन
    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

    राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू विजयकुमार चौबे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, धनुर्विद्यापटू मधुरा धामणकर आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदारदिनाची प्रतिज्ञा घेतली.

    निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणी महत्वाची असते. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव असण्याची दक्षता घ्यावी व आपला मताधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी केले. मतदार म्हणून कर्तव्य बजावण्याच्या शपथेचा उल्लेख करत कुलगुरू डॉ. चौबे म्हणाले की, मतदार प्रतिज्ञेचे पावित्र्य जाणून ती सर्वांनी ती आचरणात आणावी व मतदार म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे.

    मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, स्वयंसेवक आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे यांनी सूत्रसंचालन केले. अमर कथोरे यांनी स्वागतगीत म्हटले. तहसीलदार संतोष काकडे यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, क्रीडा प्रशिक्षक पवन तांबट आदी यावेळी उपस्थित होते.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code