अमरावती (प्रतिनिधी) : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेतून गावांचा शाश्वत विकास साधणारी विकासकामे प्राधान्याने राबवावीत, असे निर्देश मनरेगा आयुक्त शान्तनू गोयल यांनी आज येथे दिले.
तिवसा तालुक्यातील सार्सी, पालवाडी येथे योजनेतून झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी आज आयुक्तांनी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी योजनेचे लाभार्थी व मजूर बांधवांशीही संवाद साधला.सरपंच रिनाताई मंजू, उपजिल्हाधिकारी राम लंके, तिवस्याचे तहसीलदार वैभव फरताडे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, ग्रामसेवक जी.के. मांगरुळकर यांच्यासह महसूल व वन विभागाचे अधिकारी तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.
श्री. गोयल म्हणाले की, ग्रामीण नागरिकांचे राहणीमान उंचावेल व गावाची कायमस्वरुपी मालमत्ता निर्माण होईल या दृष्टीने योजनेच्या माध्यमातून पायाभूत सोयींची कामे प्राधान्याने करावीत. जलसंधारण व जलसंवर्धन, दुष्काळ प्रतिबंधक कामे, वनीकरण व वृक्ष लागवड, जलसिंचन कालव्यांची कामे, पूरसंरक्षणाची कामे, पाणथळ क्षेत्रात चाऱ्याची कामे, बारमाही जोडरस्त्यांची कामे अशी विविध कामे राबवावीत.
गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व गावपातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी मनरेगा योजना महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अधिकाधिक कामे राबवावीत. आवश्यक कामांसाठी आराखडा तयार करुन परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी विहित मुदतीत सादर करावेत, असे श्री. गोयल यांनी सांगितले.
मनरेगा योजनेतून सार्सी गावात निर्माण करण्यात आलेले जनावरांचे गोठे, शेतातील विहीर बांधकाम तसेच पालवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षणासाठी भिंत बांधकाम, वृक्ष लागवड आदी कामांची पाहणी आयुक्तांनी केली. लाभार्थी व मजूरांशी संवाद साधून त्यांनी कामाची माहिती व मजुरांच्या अडचणी जाणून घेतल्या. वैयक्तिक विहिर बांधकामाच्या माध्यमातून शेत परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसून येत असून शेतीपिकांचे उत्पादनात वाढ झाली आहे. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबविण्याची सूचना श्री. गोयल यांनी केली.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या