Header Ads Widget

प्रजासत्ताक

  आज प्रजासत्ताक दिन
  अवघा आनंदी आनंद
  गुलामी इंग्रजाची झाली
  कशी ईथे हो! बंद
  लिहिली घटना भारताची
  दिले सर्वाना अधिकार
  असे संविधान देवून
  केले देशावर ऊपकार
  नाही धर्म नाही पंथ
  सारे एकसाथ केले
  घटनेपुढे सारे सारखे
  एका माळेत हे गुंफले
  एक मत एक माणूस
  नाही भेदाभेद त्यात
  असी समानता आणली
  घटनापतीने या देशात
  गाजते जगात घटना
  या स्वतंञ भारताची
  समता स्वातंञ बंधूता
  ही तत्व संविधानाची
  ठेवण्या राष्ट्र एकात्म उक्ती
  या महान शिल्पकाराची
  डाॅ बाबासाहेब आंबेडकर
  या महानायकाला माझे नमन
  कोटी कोटी च्या युंगधराला
  माझे हे कोटी कोटी वंदन..!
  -स्नेहल अभ्यंकर
  अकोट
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या