Header Ads Widget

विभागीय महसूल स्पर्धेत अमरावती जिल्ह्याची बाजी

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हा महसूल अधिकारी व कर्मचारी संघाने विविध खेळांत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली.

  विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकतीच वाशिम येथे झाली. त्यात पाचही जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. त्यात सर्वाधिक क्रीडा प्रकारात यश मिळवत अमरावती जिल्हा महसूल कार्यालयाचा संघ आघाडीवर राहिला. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद जिल्ह्याला प्राप्त झाले. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह संघाच्या सदस्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. वाशिमच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंग आदी उपस्थित होते.

  फुटबॉल, हॉलिबॉल, धावणे (२०० मी., महिला व ४०० मी. पुरूष), बॅडमिंटन एकेरी पुरूष, बॅडमिंटन दुहेरी पुरूष, टेबल टेनिस मिश्र, कॅरम एकेरी महिला, कॅरम दुहेरी पुरूष, लांब उडी, रिंग टेनिस दुहेरी महिला, थ्रो बॉल महिला, थाळी फेक पुरूष या क्रीडा प्रकारांत अमरावती जिल्हा संघाने प्रथम क्रमांक मिळवला. क्रिकेट, कब्बडी, धावणे, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारांतही संघाने उत्तम कामगिरी केली.

  संघाचे राहूल दहिकर, सुनीता बेलसरे, संजय गजभ, मारोती तोटे, सचिन कन्नमवार, गोकुळ निषाद, रक्षा डोल्लरवार, सौरभ डब्ल्यू., अतुल डी., सुप्रिया अरोरकार, प्रमोद सोळंके, प्रमोद सोंडणेकर, संध्या ठाकरे, लता बसवनाते, किशोर झोंबाडे, छाया वानखडे, परवेज पठाण, रोशन दातार, सारिका रघुवंशी, प्रवीण काळे, प्रताप बेडेकर, देवानंद मेश्राम, अरूणा वानखडे, मीनाक्षी बाहेकर आदी खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत विविध बक्षीसे पटकावली.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या