Header Ads Widget

प्रजापिता ब्रह्मांची शिकवण जागतिक शांतीस आवश्यक

  विश्वव्यापी आध्यात्मिक शिक्षण संस्था ब्रह्माकुमारीज् चे संस्थापक पिताश्री प्रजापिता ब्रह्मा यांचा 18 जानेवारी, 2023 रोजी स्मृतिदिवस संपूर्ण जगात विश्वशांती दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त विशेष लेख.-संपादक

  जगात विविध देशांमध्ये सध्या होत असलेली साम्राज्यविस्तार स्पर्धा किंवा आणखी काही देशांमधील सातत्याने होत असलेली कुरघोडी, क्षेपणास्त्रांवरील होत असलेला वाढता खर्च आणि हिंसाचाराचे बदलते स्वरुप पाहता जागतिक पातळीवरील शांतीकरीता कोण पुढाकार घेणार हा यक्षप्रश्न आहे. या सर्वांचे मुळ आहे मानव समाजाच्या वाढत असलेल्या लोभ, लालच, क्रोध, अहंकार आदि दुगुर्णात. जागतिक शांतता हा काही बाह्य घटक नाही तर जगातील प्रत्येक मानव मात्रांच्या ठायी असलेली शांती आहे. ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयातर्फे विश्व शांतीसाठी सातत्याने प्रयत्न करणा·या लाखो साधकांचे प्रेरणास्थान प्रजापिता ब्रह्मा यांची शिकवण याप्रसंगी फार मोठे कार्य करीत आहे.

  शांती स्थापन करावयाची असल्यास प्रथमत: स्वत: पासून करावी यासाठी त्यांनी ओमशांती हा महामंत्र जगास दिला. त्यांच्या जीवनात अशा ब·याच घटना आल्यात परंतु स्थाई मन शांती त्यांनी ढळू दिली नाही. त्यामुळे याचा प्रभाव लाखो साधकांवर झाला. पुरुष प्रमुख संस्कृतीत कुटुंबातील कर्ती स्त्रीला प्रमुख अधिकार देण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्याचे काम ब्रह्माबाबांनी केले व बहिणीं-मातांच्या हातील जगातील विशाल आध्यात्मिक संस्थेचे नेतृत्त दिले. आज भारतातील आणि जगातील बहुंताश देशातील हजारो खेड्यापाडयातील राजयोग पाठशाळा ते महानगरातील मुख्य सेवाकेंद्र, क्षेत्रीय सेवाकेंद्र आणि मुख्यालय माऊंट आबू येथील सेवाकेंद्रांच्या प्रमुख ब्रह्माकुमारी बहिणी आहेत. आजच्या काळात हा फार मोठा आदर्श ब्रह्माबाबांनी मानव समाजाला दिला आहे. त्यांच्यातील असे बरेच गुण विश्वशांतीच्या कार्यात प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या स्मृतिदिवशी याचे स्मरण प्रकर्षाने होते जेव्हा या आदर्शांवर चालण्याची गजर प्रकर्षाने निर्माण झालेली आहे.

  -ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी,
  जळगाव
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या