Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

जहागीरपुर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर संपन्न

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन
    पिंपळखुटा/स्वाती इंगळे

    कुऱ्हा येथील भगवानराव प्रशासकीय महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्त ग्राम जहागीरपूर येथे संपन्न झाले.

    या निमित्त विविध श्रमदान,प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक असे कार्यक्रम संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन कमल विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सिकंदर मनवरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवीना अंभोरे कल्याणी धुर्वे, माया डोईफोडे,भारत ढोणे, पंकज जीरापुरे बाळासाहेब मुंदरे उपस्थित होते.प्राचार्य डॉ. रजनी भाकरे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या सात दिवशीय शिबिरामध्ये सकाळी योगाभ्यास, प्रार्थना, प्रभात फेरी, पथनाट्य, दुपारच्या सत्रात श्रमदान, बौद्धिक सत्र आणि सायंकाळी प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

    शिबिरातील बौद्धिक सत्रामध्ये प्रा. डॉ. नरेश इंगळे,प्रा.ओमप्रकाश पाखरे, प्रा. राजनसेन शेंडे, प्रा. डॉ. अनिल नागदेवते,सचिन आसोडे यांनी अनुक्रमे श्री संत गाडगेबाबांची प्रबोधन चळवळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास व युवका समोरील आव्हाने,भारतीय शिक्षण व्यवस्था या विषयावर व्याख्याने झालीत.शिबीर यशस्वीते करिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अंकुश अंभोरे गटप्रमुख तेजस्विनी तंवर, प्रज्वल देवघरे तसेच प्रा.निशिकांत ठाकरे, प्रा.शरद गजभिये प्रा.मोरेश्वर वेखंडे,प्रा. अमर केने संदेश कठाणे नीता इंगोले संकेत मनवरे सागर दुधे यांनी परिश्रम घेतले.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code