अमरावती (प्रतिनिधी) : जय संताजी तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा संताजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी जुना बायपास रोड स्थित संताजी भवन येथे थाटात संपन्न झाला.
सर्वप्रथम आमदार सौ. सुलभाताई खोडके व अतिथींच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,माल्यार्पण करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी व्यासपीठावर राजेश्वर लेंधे, संजय हिंगासपुरे, विनोद गासे, रामेश्वर गोदे, जयंत औतकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे स्वागत करण्यासह त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यादरम्यान आमदार महोदया यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत राहून सुद्धा तैलिक समाजाच्या उन्नतीसाठी व हितासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवर यांचा शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते संताजी दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला विनोद भिलपवार,प्रदीप भागवत, योगेश उमक, वसंतराव शिरभाते, अरुण गासे, नारायण कलहाने, प्रफुल माथूरकर, तिखिले, प्रवीण ईचे -प्रा. विलास डोईफोडे औचार, माणिकराव राऊत,कुर्हेकर साहेब आदिसहित संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.समाजाच्या सर्वागीण माहितीसाठी दिनदर्शिका ठरेल दिशादर्शक अशा शुभेच्छा आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केल्या.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या