Header Ads Widget

दापोरी नगरीमध्ये तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

    * शेकडो शालेय खेळाडु विविध क्रीडा प्रकारांत सहभागी
    * क्रीडा स्पर्धेच्या आयोजनमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    मोर्शी (तालुका प्रतिनिधी):कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला होता. दोन वर्षे शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्याच नव्हत्या. मोर्शी तालुक्यात यंदा प्रथमच या स्पर्धांचे नियोजन केले आहे. दापोरी येथून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरवात झाली आहे. ५ व ६ जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झाली असून मोर्शी तालुक्यातील शेकडो शालेय खेळाडुंनी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाल्यामुळे विविध खेळामधे चुरसीचा रंगणार सामना हजारो नागरिकांना अनुभवायला मिळाला.

    खेळाडूंची जडणघडण शालेय वयातच होते. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या नैपुण्याला वाव मिळावा, या उद्देशाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. कोरोना काळाच्या यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर तालुकास्तरीय स्पर्धांचे नियोजन केल्यामुळे शालेय खेळाडूंना मैदानातील हुकूमत दाखवण्याची संधी उपलब्ध झाली असून मन, मनगट मेंदू बळकट करण्याचे माध्यम म्हणजे खेळ असून प्रत्येकाला खेळण्याची आणि कलेची आवड असावी, आणि एक कला तरी जोपासावी असे प्रतिपादन नितीन कुमार हिंगोले यांनी यावेळी केले.

    यावेळी दापोरी येथे तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव च्या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी गट विकास अधिकारी उजवला ढोले, उदघाटक उप विभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, प्रमुख अतिथी म्हणून शीक्षक बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत, राजेंद्र हूड लेखाधिकारी, रविंद्र पवार पशु धन अधिकारी, नीलकंठ यावले, मनीष काळे, शिक्षक संघटना चे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष विचारपीठावर उपस्थित होते.

    यावेळी मोर्शी तालुक्यातील अनेक शाळांनी आपले निदर्शने सादर केलीत, जिल्हा परिषद शाळा दापोरी, जी प शाळा, पार्डी, जी प कन्या शाळा नेर, उमरखेड, वाघोली या शाळांनी आपले कला कौशल्य दाखवले, या क्रीडा स्पर्धेसमद्ये मोर्शी प स मधील एकूण एक हजार विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. कोरोना नंतर पहिल्यांदा हा महोत्सव मोर्शी तालुक्यातील दापोरी क्रीडा नगरी मधे होत असल्याने क्रीडा प्रेमीचा आनंद बघण्यासारखा होता.कार्यक्रमाचे संचलन गजानन चौधरी आणि मिर्झा मॅडम यांनी केले आणि आभार मुजाहिद सर यांनी मानलेत क्रीडा स्पर्धा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व केंद प्रमुख, शिक्षक संघटना, शिक्षक, शिक्षिका, दापोरी नगरीतील गावकऱ्यांनी मोलाची मदत केली.

    --------

    खेळ ही मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे सर्व तासांमध्ये खेळाचा तास हा सर्वांचा आवडता तास असतो. शिवाय कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्षित झाले होते. याच अनुषंगाने तालुकास्तरीय खेळांचे आयोजन करण्यात आले. मनाची व शरीराची वृद्धी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची खेळ खेळणे आवश्यक आहे. शिवाय यामधून विद्यार्थ्यांना हार जीत पचवण्याची ताकद निर्माण होते.

    -गजानन चौधरी
    केंद्रप्रमुख
    -----
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या