- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : दिनांकः ४जानेवारी २०२३ ला रामा केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हाळमाकडी या ठिकाणी पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा.मा.चंदाताई चिकनकर सरपंच ह्या होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मा.सागरजी धांडे साहेब हे होते .या कार्यक्रमाला विशेष अतीथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा परचाके ,ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई नामूर्ते तसेच श्रीमान श्रीकांतजी चिकनकर साहेब,केंद्रप्रमुख वनमाला डोकरीमारे मॅडम उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण करून करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय वनमालाताई डोकरीमारे केंद्रप्रमुख यांनी केले. पाहुण्यांचे शब्दसूमनाने स्वागत उच्च प्राथमिक शाळा रामा येथील विद्यार्थिनीनी केले. या स्पर्धेत एकूण रामा केंद्रातील सात शाळांनी भाग घेतला. अतिशय उत्साह आणि खिलाडू वृत्तीने या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील सांघिक गटात प्रथम क्रमांक उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी वरिष्ठ कबड्डी मुले ,वरिष्ठ कबड्डी मुली, कनिष्ठ कबड्डी मुले,व वरिष्ठ लंगडी मुली यांनी पटकावला.
सांघिक गटातील द्वितीय क्रमांक उच्च प्राथमिक शाळा रामा यांनी पटकावला. विजेत्या चमुना बक्षीस वितरण करण्यात आले. विशेष बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हाळमाकडी या शाळेला देण्यात आले. समुह नृत्य स्पर्धेत उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर समुह नृत्य स्पर्धेत दुसरा क्रमांक उच्च प्राथमिक शाळा रामा या शाळेचे पटकावला. वैयक्तिक खेळात उच्च प्राथमिक शाळा रामाने पटकवला.या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेची चॅम्पियनशिप उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी ला देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालक सन्माननीय हिरामण तेलंग सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनश्री राजेंद्र घावट सर यांनी मांनले.
या कार्यक्रमाला क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी फुलझले सर ,शंभरकर सर ,शेंडे सर, मिलमिले मॅडम, कडू मॅडम, घोडपागे मॅडम,मोरे मॅडम, आकरे मॅडम, दवंडे सर,खंगार सर,तिमांडे सर. यांनी विशेष मेहनत घेतली. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत येथे कर्मचारी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला फार सहकार्य केले. गावातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाला मदत केली. शेवटी वंदे मातरम् होऊन केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली.
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या