Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

श्रीराम कला महिला महाविद्यालय धामणगाव रल्वे नॅक बी ग्रेड नी मानांकित

  पिंपळखुटा/स्वाती इंगळे

  श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित श्रीराम कला महीला महाविद्यालय धामणगाव रल्वे येथे नुकतीच NAAC Peer Team बेंगळुरू नी भेट दिली. सदर चमू मधे अध्यक्ष म्हणून डॉ. विभाष चंद्र झा कुलगूरू टि एम. भागलपूर विद्यापीठ भागलपूर बिहार, सदस्य प्रा डॉ. शूची श्रीवात्सव एम. बी ए विभाग मौलाना आजाद नॅशनल इन्स्टीटयूट भोपाळ मध्यप्रदेश व प्राचार्य डॉ. पार्वती अपाया फिल्ड मार्शल महाविदयालय कोडागू कर्नाटक येथील होते.

  आपला दोन दिवसीय भेटी मध्ये त्यांनी संपूर्ण महाविदयालयाचे व कामकाजचे परीक्षण केले. सर्वप्रथम प्रभू रामचंद्र व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अपर्ण केल्या नंतर त्यानी आपल्या कामकाजास सुरुवात केली. महाविदयालायाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर राऊत यांनी सर्वाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व प्रार्चायाचे P P T सादरीकरण केले. त्या नंतर महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विषयाची व विभागाची माहीती PPT. द्वारे दिली. यामधे प्रा अभिजीत दोड यांनी भूगोल विभाग प्रा नितीन बिहाडे यांनी राज्यशास्त्र विभाग , डॉ. मोनाली इंगळे यांनी गृहअर्थशास्त्र विभाग डॉ. योगेश काशीकर यांनी इंग्रजी विभाग डॉ नंदकिशोर राऊत यांनी समाजशास्त्र विभाग व प्रा सूर्वणा घोपे यांनी मराठी विभाग यांचे सादरीकरण केले.

  त्यानंतर नॅकच्या चमूनी सर्व विभागांना भेटी दिल्या त्यामधे मराठी विभाग प्रा सुवर्णा घोपे व ग्रंथालय येथे डॉ निता केने व शारीरिक शिक्षण विभाग येथे डॉ. सुधीर पाथरे यांनी केलेले कार्य बघीतले त्यानंतर गृहअर्थशास्त्र येथे डॉ. इंगळे तर भूगोल विभागा मधे प्रा अभिनीत दोड तर राज्यशास्त्र व समाजशास्त्र विभागात प्रा नितीन बिहाडे व डॉ. नंदकिशोर राऊत यांनी केलेले कार्य बघीतले.

  नॅक चमूनी संस्थेचे अध्यक्ष मा श्री अरुणभाऊ अडसड सचिव मा.श्री. घनश्यामजी मेश्राम उपाध्यक्ष मा श्री संजयजी राठी, संचालक मा.श्री सुभाषराव देशमुख , मा श्री प्रमोद मुंदडा, मा.श्री किशोरभाऊ साकुरे, मा श्री विलासभाऊ कडू तसेच सर्व माननिय संचालकां सोबत संवाद साधला. त्यानंतर नॅक चमूनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक, महाविद्यालयाचे मैदान, सेमीनार हॉल, कॉमन रूम, वर्ग खोल्या, बेस्ट प्रॅक्टीस, आय. क्यू. ए. सी. विभाग, माजी विद्यार्थी संघटन, पालक संघटन इत्यादीला भेटी देवून परीक्षण केले. संध्याकाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी आयोजीत केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. व विद्यार्थीनींनी सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे कौतूक केले.

● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

  दुसऱ्या दिवशी महाविद्यालयामध्ये एक्झिट मीटिंग चे आयोजन करण्यात आलेले होते या सभेमध्ये नॅकचमुचे अध्यक्ष डॉ. विभाष चंद्र झा यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले आपल्या भाषणामध्ये त्यांनी महाविद्यालयातील जमेच्या बाजू सांगितल्या तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालय असून सुद्धा येथे असलेल्या सोई सुविधांचे कौतूक केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांमधील संवाद, विश्वास व सलोखा वृद्धींगत व्हावा असे प्रतिपादन करून नॅक चमूचा गोपनिय अहवाल प्राचार्य डॉ. नंदकिशोर राऊत यांच्याकडे सोपविला.

  नॅक चमूच्या व्यवस्थेसाठी तसेच नामांकनासाठी व यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा श्री अरुणभाऊ अडसड तसेच सचिव मा श्री घनश्यामजी मेश्राम तसेच सर्व संचालक व पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर राऊत , डॉ. योगेश काशीकर,डॉ. सुधीर पाथरे, डा. मोनाली इंगळे, प्रा नितीन बिहाडे, प्रा. अभिजीत दोड ,डॉ. राजेश आडे, डॉ.निता केने, प्रा सूवर्णा घोपे, प्रा दिपाली भगत, प्रा दादाराव उईके अजय कुलकर्णी, राजेश भैय्या, राजेश मारवे, संतोष सीसोदे, शरद गवारले, नागोराव पंचबुद्धे, प्रफूल कांबळे, कल्पना चव्हाण तसेच बहुसंख्य विद्यार्थी कु. प्रगती बोरकुटे कु. योगिता दुबे, कु निधी खडसे , कांचन वाट, काजल खंडारे, प्रांजली ठाकरे, आचल चौधरी, शिवानी पंधरे, तेजल कुरडकर, काजल चौधरी, पल्लवी ठाकरे, मनिषा गायकवाड, पल्लवी गावंडे, भारती ठाकरे, प्रियंका शेलोटे, दीक्षा मात्रे, तेजस्विनी काळे, काजल मेंढे, राणी भुते, काजल चौधरी, ममता मेहर, अपेक्षा इंगळे, आरती मेंढे, अर्पिता मेश्राम, आरती तितुरमारे, आयुषी चुटे, भाग्यश्री म्हात्रे, धनश्री बागडे, पुनम शिंदे, साक्षी नागोसे, स्वीटी वानखडे पुजा ठाकरे, आरती चौधरी, प्राची वाळके, शिवानी यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code