Recent in Technology

Advertisement

Breaking News

Abhay Yojana : थकीत पाणीपट्टी ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : थकीत पाणीपट्टी ग्राहकांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने विलंब आकार माफीच्या सवलतीची अभय योजना दि. 21 जानेवारी 2022 पासुन जाहीर केली असून जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी केले आहे.

    जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमरावती पाणी पुरवठा योजना, चिखलदरा पाणी पुरवठा योजना, 156 गावे व 2 शहरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. दर्यापुर, अंजनगाव व भातकुली तसेच 105 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. चांदुरबाजार, भातकुली व अचलपुर व 79 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. अंजनगाव व अचलपुर या ठिकाणी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येतात.

    या योजनेतील थकबाकीदार ग्राहकांनी थकबाकीची पुर्ण रक्कम भरल्यास विलंब आकारावर 100 टक्के व्याज माफीची सवलत दिली जाणार आहे. अभय योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांनी नजीकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात किंवा संबंधित वसुली कर्मचाऱ्याकडुन अर्ज प्राप्त करून आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code