- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 144 (1) व (3) अन्वये पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
मकर संक्रातीचा सण नागरिक मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची खरेदी विक्री केली जाते. नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. मकरसंक्राती सणाच्या कालावधी दरम्यान शहरातील नागरिक व व्यवसायी यांना नायलॉन मांजा, प्रतिबंधीत साहित्य, ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईटव्दारे व नायलॉन मांजा कुरिअरव्दारे वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिस्थितीचा विचार करून सदरचा आदेश दि. 4 ते 31 जानेवारी च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या