- * प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मोहिम
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न केल्याने रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. हे लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे हेल्मेट व सीटबेल्ट तपासण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
हेल्मेट व सीटबेल्ट न घातल्याने देशात २०२१ या एकाच वर्षात ६२ हजार ९९० व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यातही हेल्मेट न घातल्याने ४५ हजार ५९३ व्यक्तींचा मृत्यू झाला. सीट बेल्ट न घातल्याने १६ हजार ३९७ व्यक्तींचा बळी गेला. देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ७.१ टक्के अपघात झाले असून, त्यांची संख्या २९ हजार ४७७ इतकी आहे. हे टाळण्यासाठी व नियमांचे पालन व्हावे म्हणून हेल्मेट व सीटबेल्टची विशेष तपासणी मोहिम प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हाती घेतली आहे.
हेल्मेट, सीटबेल्टची तपासणी, तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वाहनाला रिफ्लेक्टर नसणे, सिग्नल, लेन तोडणे, मालवाहतुकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, तसेच अनुज्ञप्ती, विमापत्र, परवाना, योग्यता प्रमाणपत्र व प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रांच्या वैधतेची देखील वायुवेग पथकांद्वारे तपासणी केली जाईल. तरी वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा व वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–