- * समाजाचे हक्काचे आरक्षण लवकरच मिळणार
- * मा.मुंबई उच्च न्यायालयात १६ फेब्रुवारीला सुनावणी
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
मुंबई, : धनगर समाजाला लवकरच त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल,असा दावा इंडिया अगेन्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे.आज, सोमवारी (ता.२३) धनगर आरक्षणासंदर्भात मा.उच्च न्यायालयात सुनावणी झाली.न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या खंडपीठाने यापूर्वीच धनगर आरक्षणाविरोधात असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाला स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते.न्यायालयाच्या निर्देशानंतर सोमवारी स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे.आता पुढील महिन्यात १६ फेब्रुवारीला याप्रकरणावर सुनावणी घेण्यात येईल.
केंद्र तसेच राज्य सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात न्यायालयात सादर केलेले उत्तर तसेच इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि महाराष्ट्र अहिल्याबाई समाज प्रबोधिनी मंच, वनवासी कल्याण आश्रमाच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्यात येईल, असे हेमंत पाटील म्हणाले. आदिवासी समाजावर अन्याय होवू न देता धनगर बांधव त्यांच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करीत आहेत.अशात आदिवासी बांधवांकडून कितीही विरोध झाला तरी धनगर बांधवांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.धनगर समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे, असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील धनगर समाजबांधवांसाठी आतापर्यंत केलेल्या आंदोलनांना यश मिळणार असून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल.पाटील यांनी आतापर्यंत आरक्षणासंदर्भात २ हजार पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.लवकरच धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखल मिळणार आहे.समाजाला आरक्षण मिळाले आहे,पंरतु त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने समाजबांधव आरक्षणापासून वंचित असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य