- * सिद्धी विनायक महिला बचत गट महासंघा द्वारे स्टॉल नोंदणीचे आवाहन
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून अमरावतीचा नावलौकिक आहे. कला, क्रीडा, मनोरंजन,साहित्य आदी क्षेत्रात अमरावतीचा लौकिक असून विविध उत्सव,महोत्सव व स्पर्धा तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून अमरावतीकरांनी नेहमीच जल्लोष व आनंदाची मेजवानी अनुभवली आहे. त्यात दरवर्षीं साजरा होणार प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान चा भव्य-दिव्य व अभूतपूर्व असा सांस्कृतिक महोत्सव अमरावती शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ व कलेचे नवे दालन खुले करणारा ठरला आहे.
दोन वर्ष कोरोनामुळे सांस्कृतिक महोत्सव होऊ शकला नाही . यंदा मात्र नवीन वर्षात याची प्रतीक्षा संपली असून शहरवासीयांची उत्सुकता देखील शिगेला पोहिचली आहे. शोध प्रतिष्ठानचे सचिव श्री.यश खोडके यांच्या संकल्पनेतून सांस्कृतीक महोत्सव २०२३ चे आयोजन दिनांक २७,२८ व २९ जानेवारी २०२३ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे करण्यात आले आहे. यामध्ये विविध कलाविष्कार व रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी अमरावतीकरांना देण्यात आली आहे. तसेच अमरावती गार्डन क्लब द्वारा आयोजित भव्य पुष्प प्रदर्शनी या महोत्सवाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
सांस्कृतिक महोत्सवांतर्गत सिद्धी विनायक महिला बचत गट महासंघाच्या वतीने दरवर्षी महिला बचत गट वस्तू विक्री व प्रदर्शनी चे आयोजन करण्यात येते महिलांचा आर्थिक विकास व्हावा व महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना ग्राहक वर्ग लाभावा यासाठी सिद्धी विनायक महिला बचत गट महासंघाच्या वतीने सांस्कृतिक महोत्सवांतर्गत महिला बचत गट प्रदर्शनी व विक्रीचे सुद्धा २७,२८ व २९ जानेवारी २०२३ पर्यंत तीन दिवसीय आयोजन राहणार आहे. यामध्ये महिला बचत गट आपले उत्पादने जसे की, गृहपयोगी वस्तू, सजावट तसेच श्रुंगार साधने, हस्त कलात्मक वस्तू, विविध कलाकृती, मसाले पदार्थ तसेच विविध खाद्य पदार्थ यासह विविध उत्पादने यांचे स्टॉल साकारायचे आहेत.
सांस्कृतिक महोत्सवांतर्गत सिद्धी विनायक महिला बचत गट महासंघा द्वारे आयोजित महिला बचत गट प्रदर्शनी व विक्रीसाठी स्टॉल लावण्याला घेऊन दिनांक ०५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. ज्या महिला बचत गटांना सांस्कृतिक महोत्सवात स्टॉल लावायचे आहेत, त्यांनी सिद्धी विनायक महिला बचत गट महासंघ कार्यालय राजापेठ मनपा व्यापारी संकुल अमरावती येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता या वेळेत सचिव निलभाताई ठाकरे यांच्या कडे संपर्क व नोंदणी करता येणार आहे. करिता जिल्हातील महिला बचत गटांनी यामध्ये आपला मोठा सहभाग दर्शविण्याचे आवाहन सिद्धी विनायक महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष तथा आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–