विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर अंगभूत कलांचे प्रदर्शन करावे- अप्पर आयुक्त सुरेश वानखडे

    * ‘संकल्प गुणवत्तेचा’ २०२३ अंतर्गत नृत्य स्पर्धेत १७ शाळांचा सहभाग
    * शिस्तबद्ध व्यवस्थापनात आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केले कलागुण
    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच आज ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा विविध क्षेत्रात पुढे येत आहे. नेरपिंगळाई येथील कृष्णकमल अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुण बघून मी भारावून गेलो. या शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर, सृजनात्मक आहे. येथील आदिवासी विदयार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने केलेले स्वागत अविस्मरणीय असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर अंगभूत कलांचे प्रदर्शन करावे असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त सुरेश वानखडे यांनी केले. ते श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित, कृष्णकमल अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील ‘संकल्प गुणवत्तेचा’ २०२३ अंतर्गत नृत्य स्पर्धाअंतर्गत उदघाटक म्हणून बोलत होते. ‘संकल्प गुणवत्तेचा’ २०२३ अंतर्गत नृत्य स्पर्धेत श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टमधील १७ शाळांचा सहभाग होता. यावेळी अप्पर आयुक्त वानखडे यांनी कृष्णकमल अनुदानित आदिवासी आश्रम शाळेच्या शिस्तबद्ध व्यवस्थापन, आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक केले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष कीर्ती राजेश अर्जुन, सचिव प्रा.पी.आर.एस.राव, प्रशासकीय अधिकारी प्रा. सचिन पंडित, शैक्षणिक गुणवत्ता समिती प्रमुख डॉ. वर्षा गावंडे, शाळानिरीक्षक प्रा.निलेश देशमुख, नेरपिंगळाईच्या सरपंच सविता खोडस्कर, ग्रा. पं. सदस्य अलका राऊत, नृत्य परीक्षक राजेश शेदाणी (अंबू ), माध्यमिक मुख्याध्यापक विशाल गायकवाड, प्राथमिक मुख्याध्यापक हेमंत सोलव यांची उपस्थित होती. सर्व पाहुण्यांचे स्वागत उज्वल सरदार यांनी विद्यार्थ्यांसह बसविलेल्या आदिवासी पारंपरिक स्वागत गीताने झाले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी जननायक बिरसा मुंडा, संस्थेचे आधारस्तंभ स्मृतिशेष रा.सु.गवई यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. स्वागतानंतर पारंपरिक आदिवासी नृत्य, सरी रे सारी, सामी सामी, माउली माउली, कथ्थक-मुजरा, शेतकरी नृत्य, माय भवानी, अंबाबाईचा गोंधळ, छत्रपती शिवाजी महाराज या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

    संस्थेच्या अध्यक्ष कीर्ती राजेश अर्जुन आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, दिवसेंदिवस श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टमधील विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. शाळा निरीक्षक प्रा. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात गुणवत्तेवर खऱ्या अर्थाने काम होत आहे. संस्थेमार्फत संकल्पना व गुणवत्तेचा २०२२-२३ अंतर्गत चित्रकला, सामान्य ज्ञान, प्रश्नमंजुषा, वाद-विवाद स्पर्धा, नृत्यस्पर्धेसह विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा स्पर्धा आयोजित केल्याचा आनंद होत आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नाळ आमच्यासोबत जुळली आहे. संस्थेचे सचिव प्रा.पी.आर.एस.राव यांनी ‘संकल्प गुणवत्तेचा’ २०२३ अंतर्गत नृत्य स्पर्धेच्या उत्कृष्ट, शिस्तबद्ध आयोजनाबद्दल कृष्णकमल अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक विशाल गायकवाड, प्राथमिक मुख्याध्यापक हेमंत सोलवसह सर्व शिक्षक, शिक्षकेततर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक राम सिरस्कर, वैशाली डहाटे आभार देव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप भोजनदानाने झाला.

    आ. किरण सरनाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    ‘संकल्प गुणवत्तेचा’ २०२३ अंतर्गत नृत्य स्पर्धेत बक्षीस वितरणाचा समारोप आ. किरण सरनाईक यांच्या हस्ते झाले. ‘अ’ गटात प्रथम क्रमांक कमलज्योत मराठी प्रायमरी शाळा, नवसारी, द्वितीय क्रमांक प्रेरणा प्रायमरी इंग्लिश शाळा, विहिगाव, तृतीय क्रमांक कमलसूर्य इंग्लिश स्कुल, गौरखेडा, उत्तेजनार्थ बोधी लोटस कॉन्व्हेंट, अमरावती याना पारितोषिक मिळाले.’ब’ गटात प्रथम क्रमांक मदन महाराज विद्यालय, फुलआमला, द्वितीय क्रमांक दादासाहेब गायकवाड इंग्लिश स्कुल, दारापुर, तृतीय क्रमांक कृष्णकमल अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, नेरपिंगळाई, उत्तेजनार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपूरा, अमरावती याना पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र हे होते. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण राजेश शेदाणी (अंबू ) यांनी केले.

    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–