• Wed. Sep 27th, 2023

राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची – डॉ एफ सी रघुवंशी

  * संस्थेचा आयआयएसईआर, पुणे सोबत सहयोग करार स्वाक्षांकित
  * शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आत्मसात करण्यासाठी फुंकला बिगुल
  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीची लगबग संपूर्ण देशभरात सुरू असतानाच या धोरणाशी सुसंगत अशी भूमिका घेऊन संपूर्ण विदर्भातील प्राध्यापकांच्या अध्यापन पद्धतींवर संशोधनपूर्ण कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी महत्वाचे पाऊल श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीने उचलले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेवेलपमेंट अकॅडमी (एमएसएफडीए) च्या माध्यमातून तसेच आयआयएसईआर पुणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. यासाठी नुकताच श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती ने आयआयएसईआर, पुणे या संस्थेची सहयोग करार स्वाक्षंकित केला.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  या अभियानाची सुरुवात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आली. या कार्यशाळेत नाविन्यपूर्ण अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन पद्धती विज्ञान तसेच गणित विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

  या कार्यशाळेचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ एफ सी रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ विजय ठाकरे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या उद्घाटन समारंभासाठी आयआयएसईसआर, पुणे येथील वैज्ञानिक तसेच या प्रकल्पाचे समन्वयक डॉ सौरभ दुबे, डॉ असीम आवटी, डॉ मनवा दिवेकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ डब्लू एस बरडे, कार्यशाळेचे आयोजक डॉ दिनेश खेडकर आणि डॉ पंकज नागपुरे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर वक्तव्यात डॉ रघुवंशी यांनी अनेक योजनांचा दाखला देत, सर्व योजनांच्या सफलतेसाठी प्रत्यक्ष योजनेचे लाभार्थी असलेल्या घटकांनी कार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. अनेक योजना अपयशी होण्यासाठी देखील हेच लाभार्थी कारणीभूत असतात यासाठी खेद देखील व्यक्त केला. राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांची असल्यामुळे आपल्या कर्तव्याप्रती जागृत राहून त्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत आपली अध्यापन पद्धती समृद्ध कशी होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन या निमित्ताने केले.

  उद्घाटन सत्राच्या अध्यक्षीय संबोधनातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ विजय ठाकरे यांनी संस्थेची भूमिका विशद करताना संस्थेअंतर्गत कार्यरत प्रत्येक प्राध्यापकाने आपल्या अध्यापन पद्धती अद्ययावत कराव्या यासाठी विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठीच आयआयएसईसआर, पुणे सारख्या नामांकित संस्थेचे सहकार्य मिळावे याकरिता सहयोग करार करण्यात येत असल्याची भूमिका मांडली. संपूर्ण विदर्भात याच धर्तीवरच्या कार्यशाळा सातत्याने राबविल्या जातील आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रत्येक प्राध्यापकाला या कार्यशाळेच्या माध्यमातून आपले अध्यापन कौशल्य वृद्धिंगत करण्याची संधी दिल्या जाईल अशी ग्वाही दिली.

  उद्घाटन सत्राच्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी व्ही कोरपे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून या कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. श्री शिवाजी विद्यान महाविद्यालयाद्वारा आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांच्या व्यावसायिक उन्नतीसाठी देखील सातत्याने प्रयोग केला जात असल्याचे बाब प्रकर्षाने मांडली.

  उद्घाटन समारंभाचे संचालन डॉ दिनेश खेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ पंकज नागपूर यांनी केले. या तीन दिवसीय कार्यशाळेत राज्यभरातील विविध महाविद्यालयांतून विज्ञान आणि गणित विषय शिकवणारे प्राध्यापक सहभागी झालेले आहेत.

  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,