• Mon. Jun 5th, 2023

क्रांतीज्योती

इतिहास सांगतो तुझा

कार्याला तुझ्या सलाम आहे
जगी सर्व तिन्ही लोकी
क्रांतीज्योती महान आहे
शिक्षण देण्या मुलींना
स्वतःभोगिली तू यातना
आजन्म करीत आली तू
शिक्षणासाठी साधना*l
स्त्री जन्म यशस्वीतेचे
तू एक निशान आहे
जगी सर्व तिन्ही——-
कुणी फेकी चिखलदगड
तेही झेलले तू फुलांसम*l
स्त्री शिक्षणासाठी सदैव तू
मनुवाद्यांना दिला दम
भारतीय स्त्रियांसाठी फक्त
तूच एक वरदान आहे
जगी सर्व तिन्ही——-
शुभ्र निर्मळ झरा तू
वाहत्या ज्ञानगंगेचा
अन फुलविला प्रकाश तू
ज्ञानमय अमृत जीवनाचा
विना तुझ्या हा संसार
फक्त एक स्मशान आहे
जगी सर्व तिन्ही———
-अवीनाश अशोक गंजीवाले (सहा. शिक्षक) जि.प.प्राथमिक शाळा करजगाव
पं. स. तिवसा, जिल्हा अमरावती
मो नं 9371733659

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *