ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमुळे घरबसल्या दस्त नोंदणी करता येणार

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिकांना स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व त्यांच्यात होणा-या प्रथम विक्रीच्या करारमान्याची नोंदणी करता येणे शक्य आहे. त्यासाठी ऑनलाईन ई-रजिस्ट्रेशन प्रणाली नोंदणी महानिरीक्षक कार्यालयामार्फत विकसित करण्यात आली आहे.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  या प्रणालीबाबत बांधकाम व्यावसायिकांची कार्यशाळा नुकतीच नागपूर येथील चिटणीस सेंटर येथे झाली. नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, तसेच नागपूर व अमरावती विभागातील क्रेडाईचे सदस्य, अनेक बांधकाम व्यावसायिक, अधिवक्ते, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

  घरबसल्या दस्त नोंदणीची कार्यवाही करण्यासाठी विकसित केलेली इ-रजिस्ट्रेशन प्रणाली विभागासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. बांधकाम व्यावसायिक स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व बांधकाम व्यावसायिकांतील प्रथम विक्रीच्या करारमान्याची नोंदणी या प्रणालीमार्फत करू शकतात. त्यासाठी नोंदणी कार्यालयात जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही, असे श्री. हर्डीकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम प्रकल्पाची सर्व माहिती प्रणालीवर नोंदविणे आवश्यक आहे. ही प्रणाली 24×7 कार्यान्वित राहणार आहे. सुटीच्या दिवशीही बांधकाम व्यावसायिक दस्तऐवज नोंदवू शकतील. या प्रणालीचा वापर केवळ कार्यालयीन वेळेतच करावा असे कुठलेही बंधन नाही. बिल्डर हे त्यांच्या व पक्षकारांच्या सवडीनुसार रात्री उशिरासुध्दा या प्रणालीअंतर्गत दस्त नोंदणी करु शकतात. ही प्रणाली बिल्डर व पक्षकार यांना नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी लागणारा विलंब व दगदग कमी करणारी आहे.

  ई-रजिस्ट्रेशन हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ई-गव्हर्नन्सअंतर्गत केंद्र शासनाचा प्रथम पुरस्कार नोंदणी व मुद्रांक विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर करण्यासाठी बहुसंख्येने बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. हर्डीकर यांनी केले. प्रणालीचा वापर करताना अडचण आल्यास नोंदणी विभागाने हेल्पलाईनही तयार करण्यात आली आहे.

  अनिल कपले यांनी सूत्रसंचालन केले. किशोरकुमार मगर यांनी प्रास्ताविक केले. अनिल औतकर यांनी आभार मानले. नागपूरचे नोंदणी उपमहानिरीक्षक राजेश राऊत व अमरावतीचे नोंदणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी, तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे, श्री. कांबळे, श्री. एंबडवार, श्री. पगार, श्री. घोंगडे आदी उपस्थित होते.

  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–