• Wed. Jun 7th, 2023

आकरी दूध…!

  दि. ४/०१/२०२३. नेमिनाथनगरला विवेक पाटील या विद्यार्थ्यांच्या लग्नाला गेलो होतो बाराच्या दरम्यान लग्न होते. जेवणाचा आस्वाद घेत असतांना माझ्यासमोर मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील सर होते. मला पहाताच त्यांना अतिशय आनंद झाला. शिक्षकापैकी आवर्जुन आम्हा दोघांना आमंत्रण होतं. त्याचदरम्यान जयवंत आवटे यांच्या बहारदार कथाकथनाचे शब्द कानावर येऊ लागले. आधी वाटले कथाकथनाचे रेकाँर्ड लावले असावे. पण लग्नाच्या मंडपात दुसराच रिदम वाजत होता. काहीच कळेना. विवेकची भेट घाईघाईनेच घेतली अन् मी आवाजाच्या शोधासाठी म्हणून हाँलच्या बाहेर आलो तर आवाजाची तीव्रता वाढल्याचे जाणवले. तेवढ्यात महेश कराडकर सर भेटले.सरांना भेटलो पण मन मात्र त्या आवाजाचा शोध घेत होते. मध्येच मुलांचा हसण्याचा आवाज येत होता. तत्क्षणी वाटले. सरांचे कथाकथन चालू आहे.जवळच राजमती गर्ल हायस्कूलचे स्नेहसंमेलन सुरु असल्याचे दिसले. तेथेच कथाकथनाचा कार्यक्रम चालू होता. बरेच पालक बाहेरुनच आस्वाद घेत होते. मी ही तेथे जाऊन उभा राहिलो.

  ग्रामीण ढंगातील कथा सांगण्यात जयवंत रंगून गेले होते. दुपारचे बारा वाजले होते. पालकांचा घोळका मात्र आपसात न बोलता सरांचे कथानक ऐकत होता. ब-याच दिवसांनी चांगल्या कथाकाराची कथा ऐकण्याचे भाग्य लाभले होते. ऊन तापत होतं, अंग घामाने भिजत होतं. तहान सहन करण्यापलीकडची होती पण तरीही कोणी पाणी शोधत नव्हते. शांत उभे राहून कथाकथन ऐकत होते. ग्रामीण भाषेच्या आगळ्या चवीची संधी आयतीच पालकांना मिळाली होती. डाबंरी रस्त्यावर पाय भाजत असतांनाही सर्वजण कथानकांतील पात्रात एकरूप झाल्याने कथाकार यशस्वी झाला होता. कथेतील पात्रे अवतीभोवतीच असल्याचे जाणवत होते. कथेचा शेवट उच्च कोटीचा होता. मोबाईलच्या व्यसनात बुडालेले अनेक जण रिंग वाजली तरी मोबाईल कानाला लावत नव्हते. हे जयवंत आवटे यांच्या कथेचे साध्य आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .अशा कथाकाराला लोक मनोमन शाब्बासकीची थाप देत होते.

  कथाकाराला हेच हवे असते. जगण्यातील दुःखाची सल कमी करण्याची लस कथाकाराकडे असते हेच आज सिध्द झाले. शेवटी भारत माताकी जय घोषणांच्या, टाळ्यांच्या जल्लोशात कथानकाची सांगता झाली. सरांना भेटण्याची उत्सुकता मनात जास्तच वाढीस लागली. सर्व कार्यक्रम पार पडला घड्याळाकडे सहज पाहिले तर एक वाजून गेला होता. लोक जशी जमेल तशी जयवंताची तारीफ करीत होते. हा गडी आपल्या जिल्ह्यातील आहे याची माहिती त्यांना नव्हती. गर्दीत उभ्या असलेल्या शिक्षकांनी अनुमानानेच आवटे साहेब आपल्या जिल्हयातील आहेत असे सांगताच सर्वांचा आनंद द्विगुणित होत असल्याचे मी पहात होतो. गर्दीतून वाट काढत मी सरांना भेटण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागलो. सर्व पाहुणे, मुख्याध्यापक पोर्च मधून मुख्याध्यापकांच्या केबिनकडे चालले होते.. त्यावेळी आवटे सरांची आणि माझी नजरानजर झाली. माझ्या चालण्यातील पावलागणिक गती कधी वाढली हे मलाच कळले नाही. मुख्यापकाच्या केबिनमध्ये मध्येही जयवंत आवटेच्या कथेचीच चर्चा होती.

  मला कथा आवडल्याचे सांगतांच जयवंत यांचा चेहरा फुलला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन मी माझी भावना व्यक्त केली.. तर त्यांनी झुकुन माझ्याप्रती आदर व्यक्त करीत, ‘अरे बापरे, मला काय बोलावे तेच कळेना, हा पुष्पगुच्छ मी वडिलांना दाखवणार आहे’ असे म्हणून पुन्हा झुकुन नमस्कार केला. हे झुकणे त्यांच्या निरागस प्रेमाचं प्रतिक होतं. मला खूप काही करायचं आहे असे म्हणून दोन्ही हात हलवत, ‘येस येस् मला हे करायचे आहे. हुरुप येतो.अशा प्रसंगांनी डोळे भरून येतात. आनंदाश्रू थांबवू शकत नाही.’ साहित्यीक काय करतो याचे मूर्तिमंत उदाहरण माझ्यापुढे होते. तशा याआधी जयवंताशी मी कधीच गप्पागोष्टी केल्या नव्हत्या पण आज ते माझे झाले, मित्रासारखे नव्हे तर ते त्याहूनही माझे कोणीतरी आहेत, असे मला वाटले. हाच अनमोल ठेवा घेऊन मी घरी परतलो. पण कथेतील पात्रे मात्र माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत.कल्पनेतील पात्रे जिवंत करण्यात कथाकार यशस्वी झाला होता. जयवंताची कथा आकरी दूधच.

  -मुबारक उमराणी
  सांगली
  ९७६६०८१०९७
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–
  (छाया : संग्रहित)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *