- आम्ही मतदार । मतदान करू ॥
- लोकशाही करू । बळकट ॥१॥
- मतदार दिनी । शपथ ही घेऊ ॥
- आनंदाने जाऊ । केंद्रावर ॥२॥
- मत अनमोल । ठेवूनिया जाण ॥
- ठेऊ जरा भान। क्षणोक्षणी ॥३॥
- ध्यानात ठेवू या । दिन मतदान ॥
- करू या सन्मान। लोकशाही॥४॥
- मतदान दिनी । फक्त मतदान ॥
- नको मान पान। कशाचाही ॥५॥
- ऐकावे जणांचे । करावे मनाचे ॥
- न व्हावे कुणाचे। गुलामची ॥६॥
- वृद्ध असो युवा। या मत देऊन ॥
- राहील टिकून। लोकशाही ॥७॥
- मतदानासाठी। करू या जागृती ॥
- जनता जाणती । असावीच ॥८॥
- जाणीव असावी। देताना हे मत ॥
- विकासाची वात ।पेटणार ॥ ९॥
- चैतन्य असावे । मतदार मन ॥
- मतदार जन । सुखासाठी ॥१०॥
- टाकू नका कोणी।चला केंद्रावर ॥
- जागृत विचार ।असू द्यावे ॥११॥
- मतदार दिनी ।हार्दिक शुभेच्छा ॥
- मनस्वी सदिच्छा।सर्वांनाच ॥१२॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर , अमरावती
- भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–