नवी दिल्ली : एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी कालचं वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. आज रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीत रवीश कुमार यांचे हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम हे कार्यक्रम लोकप्रिय झाले.
रवीश कुमार यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरुन माध्यमांमध्ये दुर्लक्षित होणाऱ्या विषयांना टीव्हीच्या पडद्यावर आणलं. रवीश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेतील कामाबद्दल दोनवेळा रामनाथ गोयंका या पत्रकारितेतील मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आला होता. रवीश कुमार गेल्या अनेक वर्षांपासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत होते. एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेशी रवीश कुमार १९९६ पासून जोडले गेले होते.
एनडीटीव्हीच्या चेअरमन सुपर्णा सिंह यांनी रवीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. रवीश कुमार यांच्यासारखे लोकांवर प्रभाव टाकणारे कमी पत्रकार आहेत, हे त्यांच्याबाबत लोकांमधून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरुन दिसतं, असं सुपर्णा सिंह म्हणाल्या. रवीश कुमार अनेक दशकांपासून एनडीटीव्हीशी संबंधित होते. एनडीटीव्हीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं, असंही त्या म्हणाल्या.
एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी काल वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. आज रवीश कुमार यांनी राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून रवीश कुमार राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आज त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिला.
एनडीटीव्ही या वृत्तसमुहाची मालकी आता गौतम अदानी यांच्याकडे गेली आहे. एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी असलेल्या आरआरपीआर होल्डिंगमध्ये अदानी यांचे २९.१८ टक्के शेअर्स आहेत. अदानी यांनी २३ ऑगस्टला यासंदर्भात घोषणा केली होती. तर, २६ टक्के शेअर्स पब्लिक ऑफर्सद्वारे खरेदीची घोषणा केलेली. प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्याकडे ३२ टक्के शेअर्स आहेत.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या