Header Ads Widget

Mother : माय...

    ज्यांना आई नाही..
    त्याची व्यथा अशी असते...
    बाई तुया मायचं असणं,
    मले देत काय उसणं..
    तुया मायची सावली,
    माही पाठ व घासणं
    माया मायचा पदर,
    मले सपनात दिसते...
    माया डोयाचे आसवं
    लपून लपून पुसते..
    तुया मायले पाहून,
    मनं झुरत राहयते...
    माह्या मायची याद वं
    माया डोयातून वाहयते..
    सडा टाकतो अंगणी,
    माय सड्यात दिसते..
    आंगण सड्याचं झाडतो
    माय फड्यात हासते..
    रांगुय टाकता टाकता,
    मायचं हासणं दिसते...
    माया रांगुईतं बाई,
    माही माय वं बसते...
    माया लेकरांले आता,
    माह्या हातानं चारतो...
    घास तोंडी माय भरता,
    माय घासात दिसते...
    बाई तुया मायचं असणं,
    मले देतं काय उसणं..
    तुया मायची सावली,
    माही पाठव घासणं...
    -निर्मल काळबांडे
    अमरावती
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या