Recent in Technology

Advertisement

Breaking News

Help Line : ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन 14567

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी सर्व राज्यात 14567 हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

  राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डर लाईन 14567) चालवली जाते.

  राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे, हा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तीची काळजी घेणे तसेच इतर सेवांसाठी ही हेल्पलाईन उपयोगी ठरणार आहे. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14567 असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरु राहणार आहे. हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.

  हेल्पलाईनच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा

  हेल्पलाईनमार्फत आरोग्य, उपचार, निवारा, वृध्दाश्रम, डे केअर सेंटर, ज्येष्ठांसंबंधित अनुकूल उत्पादने तसेच सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला व करमणूक इत्यादीबाबत माहिती दिली जाते. यात कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकरण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती पुरविली जाते. क्षेत्रिय पातळीवर बेघर, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तीची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत आहे. तरी गरजू ज्येष्ठांनी मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------
  (छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code