- गाडगे बाबांचा । शिक्षण संदेश ॥
- हाची उपदेश । कीर्तनात ॥ १ ॥
- खरी सत्यसेवा । दरिद्री लोकांची ॥
- सेवा गरिबांची । रात्रंदिन ॥ २ ॥
- घर बेघरांना । अन्न भुकेल्यांना ॥
- वस्त्र उघड्यांना । दानपुण्य ॥ ३ ॥
- स्वच्छता नांदावी । उद्देश सम्यक ॥
- कर्मांत दैनिक । सामाजिक ॥ ४ ॥
- अंधश्रद्धेतून । मुक्त केले जन ॥
- घडविले मन । सत्यनिष्ठ ॥ ५ ॥
- गाडगे बाबांचा । माणूसकी धर्म ॥
- जनसेवा कर्म । रात्रंदिन ॥ ६ ॥
- जन जनार्दन । खरे पांडुरंग ॥
- सेवेत श्रीरंग । शोधणारे ॥ ७ ॥
- गाडगे नी काठी । सुंदर ते ध्यान ॥
- जीवनाचे ज्ञान । कृतीतून ॥ ८ ॥
- सामाजिक क्रांती । कीर्तनात केली ॥
- विचारात न्हाली । जन मनं ॥ ९ ॥
- गाडगे बाबांचा । जीव निरिच्छता ॥
- त्याग निस्पृहता । जीवनात ॥ १० ॥
- भुकेला जेवण । तहानेला पाणी ॥
- मधुर ती वाणी । कीर्तनात ॥ ११ ॥
- खराटा गाडगे । बाबांची संपत्ती ॥
- कीर्तनात गाती । जनगीत ॥ १२ ॥
- तिर्थी अन्नछत्रे । करुनी स्थापन ॥
- तीर्थयात्री मन । आनंदित ॥१३॥
- पंगुंना औषधी । मुक्यांना अभय ॥
- वाटू नये भय । जीवनात ॥ १४॥
- गरीब जनांना । भांडे वितरण ॥
- स्वतःचे जेवण। खापरात ॥ १५ ॥
- दु :खी जनांसाठी । देह झिजवून ॥
- संदेश महान । कीर्तनात ॥ १६ ॥
- जरीचे कापड । अपंगांना देई ॥
- अंगभर घेई। वस्त्र चिंधी॥ १७॥
- तत्त्व पुरोगामी । कीर्तनात वाणी ॥
- विचार सरणी । क्रांतिकारी॥ १८॥
- चालते बोलते । खरे विद्यापीठ ॥
- सत्य ज्ञानपीठ । कर्मयोगी ॥ १९ ॥
- गाडगे बाबांना। करितो नमन ॥
- करांनी वंदन । कोटी कोटी ॥ २०॥
- -प्रा .अरुण बाबारावजी बुंदेले
- रुक्मिणी नागर ,जि .अमरावती
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
Contents hide
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–