Recent in Technology

Advertisement

Breaking News

Gadgebaba:गाडगेबाबा....

  किर्तनाला नवी दिशा देणारे महान समाजसुधारक वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा ह्यांच्या स्मृिदिनानिमित्त त्यांच्याच दशसूत्रीवर आधारित एक वऱ्हाडी कविता..
  मी कोनाचा गुरु नाई अन् माहा कोनी चेला नाई..असे ठनकावून सांगणारे गाडगे बाबा.
  येकयी वर्ग न शिकलेले पन जेयच्या नावावर बंद्ये
  अमरावती विद्यापीठ सारे असे गाडगे बाबा.
  गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असा गजर करत काल माह्या सपनात आले बावा अन काय मने त पाहा….
  सपनी आला बाबा……..
  माह्या... सपनी आला बाबा.
  जो कोनी असंन उपाशी
  त्याले भरोजो म्हने घास
  भूकेल्याले दे म्हने अन्न.. बाबा
  सपनी आला बाबा…..
  माह्या सपनी आला बाबा.
  ज्याले आंगावर नाई कपळं
  त्याले ठेवू नोको म्हने उघळं
  नोगोयाचं झाक म्हने आंग.. बाबा
  सपनी आला बाबा…....
  माह्या सपनी आला बाबा
  जो असंन म्हने त्हानला
  मंग थो पशु राहो नाई त माणूस
  त्याले पाज म्हने पानी.. बाबा
  सपनी आला बाबा…...
  माह्या सपनी आला बाबा.
  ज्याले घेता येत नाई शिक्षन
  त्याले कर म्हने उलीकशी मदत
  गरीब लेकराईले शिको म्हने..बाबा
  सपनी आला बाबा…...
  माह्या सपनी आला बाबा.
  ज्याले झोपळी नाही राहाले
  त्याले बांधून दे म्हने झोपळी
  बेघराईले दे म्हने आसरा..बाबा
  सपनी आला बाबा…...
  माह्या सपनी आला बाबा.
  अंध अपंगाईले दे म्हने हात
  अन बिमार लोकाईले औषध
  तेयले नोको लोटू म्हने दूर.. बाबा
  सपनी आला बाबा…...
  माह्या सपनी आला बाबा.
  जे हाये म्हने बेकार
  तेयले कर म्हने हुशार
  बेरोजगाराईले दे म्हने रोजगार..बाबा
  सपनी आला बाबा…...
  माह्या सपनी आला बाबा.
  पशुपशी उनाडू दे म्हने मोकये
  करु नोको म्हने तेयची शिकार
  पशुपक्षाईले दे म्हने अभय.. बाबा
  सपनी आला बाबा…...
  माह्या सपनी आला बाबा.
  लगन कराची नसंन ज्याची ऐपत
  त्याले दे म्हने थोळासा ऐवज
  त्याचं करून दे म्हने लगंन..बाबा
  सपनी आला बाबा...
  माह्या सपनी आला बाबा
   जे हाये म्हने दुःखी कष्टी
   पाह्य म्हने करता यिल त सुखी
   दुःखी,निराशाईले दे म्हने हिम्मत..बाबा
   सपनी आला बाबा…...
   माह्या सपनी आला बाबा.
   देव नाई म्हने बाप्पा दगळात
   दगळाले काहुन करत म्हने नवस
   नवसानं नसते होत म्हने लेकरं..बाबा
   सपनी आला बाबा…....
   माह्या सपनी आला बाबा.
   ह्याच हाये म्हने रोकळा धर्म
   अन हेच हाये म्हने देवभक्ती
   लोकसेवा हीच हाये म्हने देशसेवा.. बाबा
   सपनी आला बाबा….
   माह्या सपनी आला बाबा.
   गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला.
   गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला
   गोपाला गोपाला डेबूजी बाबा गोपाला…
   -आबासाहेब कडू
   अमरावती
   ९५११८४५८३७
   --------------

   तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

   --------------------

   आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

   -बंडूकुमार धवणे
   संपादक गौरव प्रकाशन
   --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code