• Mon. Jun 5th, 2023

Gadgebaba : गाडगे बाबा आणि आजचे तरुण

    सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभलें । करी धरियले गाडगे काठी ॥
    डोई शुभ्र केस उडती वाऱ्याने चिंध्या प्रकाशाने चमकती ॥
    कीर्तनाचे रंग डुलतो प्रेमाने । भजनानंद म्हणे डेबूजीचा ॥
    लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

    स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रध्देचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते आणि आजही ते आहेत अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय. त्याला आचार विचार त्यांच्या जीवकार्याचा अभ्यास करून ते अमलात आणणे ही आज काळाची गरज आहे, परंतु साधु संत महंतांची चरित्रे आजकालच्या पिढीला टाकावू वाटतात. हातातही धरणार नाहीत कोणी आणि ही गोष्ट उघड आहेत. आजवर अनेक ढोंगी साधू संतांनी देव – देवता , धर्म, व्रत, दान, तीर्थयात्रा यांचे प्रचंड बंड माजवून ठेवले आहे लोकांना देवखुळे अन् धर्मवेडे बनवले आहे व युवा वर्ग त्याच्या जास्त आहारी गेलेला आहे. स्वर्ग मोक्ष अश्या भरमसाठ कल्पनांनी कित्येक स्त्री – पुरुषांना जीवन उद्ध्वस्त केले आहे त्यांना संसारातून उठवून भिकेला लावले.गाडगे बाबा कशासाठी झटले यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. दगड माती धातूंच्या मूर्तींचे भजन पूजनचे लोकांना वेड लावले आहे आणि आता तर माणसं पेक्षा दगड धोंडे च जास्त नशीबवान होत आहेत. अन्न वस्त्रांची गरज असलेल्या लोकांना मदत करण्या ऐवजी देव देवळाच्या उभारणी साठी आणि भट भिक्षू महाराज गोसावी यांना पोसण्यासाठी अब्जावधी रुपयाची खैरात देण्याचे काम लोकांनी चालू केले आहे. मोठमोठाले सत्संग पारायणात यांच्या माध्यमातून लोकांकडून पैसे जमा करण्याचे काम सुरू आहे आणि लोक सुधा देवाच्या नावाने खुशाल पैसे देत आहेत. माणसापेक्षा माणुसकी पेक्षा देवदेवतांची आणि महाराज लोकाची प्रतिष्ठा वाढली आहे आणि तिरस्कारनीय बुवाबाजीचा जन्म येथेच झाला.

    माणसातील माणूसपनाची अवहेलना आणि बदनामी करणाऱ्यांना या परिस्थितीला जोरदार कलाटणी देण्याचे प्रयत्न अनेक शहरी सुधारकांनी केले परंतु त्यांच्या बुध्दीवादी प्रयत्नांची आंच लक्षवधी खेड्यापाड्यात पसरलेल्या अडाणी बहुजन समाज पर्यंत जाऊन पोहोचलीच नाही आणि मुख्य म्हणजे हे अंधश्रद्धा, बुवाबाजी, करणी भानामती अश्या कोटीगणती प्रश्न खेड्यातूनच सुरू आहेत. खेड्यात क्रांती घडवणारे देखील त्यातच मातीतील असायला हवे, परंतु नुसता मातीतील असून भागत नाही तर पूर्वीचे ढोंगी साधू संत देव धर्म विषयक भ्रमिष्टवादाचा फैलावार करणाऱ्यावर सणसणीत अंजन घालणारा असल्याशिवाय, क्रांतीचे महान कार्य पूर्णत्वास जात नाही.

    कर्मयोगी, वैरज्ञामुर्ती श्री. गाडगे बाबा तसल्याच मातीतले महान क्रांतिकारक साधू होत. परंतु त्यांना कोणी साधू संत महाराज म्हतलेल खपत नसे. परंतु ज्ञानोबा तुकाराम, नामदेव, एकनाथ ,कबीर संताविषयी त्यांना खूप आदर . बाबा नेहमी म्हणत, “कुठे हे मोठमोठे संत आणि कुठे मी? कोणत्या झाडाचा पाला?” अशी कबुली त्यांनी कित्येक कीर्तनात दिली होती.एवढे साधे सरळ बाबांचे राहणीमान होते. आज आपल्या संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे परंतु हे गाडगे महाराज यांनी तेव्हाच स्वच्छतेचा मूलमंत्र आपल्याला दिला होता. परंतु आजचा युवा वर्ग स्वच्छतेकडे मुळीच लक्ष देत नाही. कचरा व्यवस्थापन निर्मूलन समिती आपल्या कडे आहेत परंतु येवढ्या भरमसाठ लोकसंख्या आलेल्या गावात शहरात देशात नागरिकांनीच शिस्त पाळणे गरजेचे आहे.

    बाबां हे मानवतेने लोकांचे सेवा करीत रहाण्यातच मानव जन्माचे सार्थक आहे असे मानणारे होते , आजपर्यंत धर्म विषयक मते माडणाऱ्या सुधारकांनी सुद्धा लाजवेल असे येवढे उत्क्रांत विचार त्यांचे आहेत. १. गांजा अफू भांग दारू यांना कडवा विरोध. २. शेतकरी कष्टकरी जनतेला साक्षरतेचा, सपेक्षाचा, अखंड उद्योगाचा , काटकसरीचा उपदेश ३. माणुसकीला बदनाम करणारे रूढी परंपरा नी देवकार्य या पासून दूर राहण्याचा उपदेश, हे गाडगे महाराजांचे उपदेश समस्थ जन हिताचे आहेत.

    गाडगे बाबा नेहमी म्हणत, “बापहो ऽऽ आपल्या मुलाले शिक्षण द्या ! पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा बायकोले लुगडं कमी भावाचे घ्या पण मुलाले शाळेत घातल्या विना राहू नकाऽऽ परंतु, आजचा शिकलेला तरुण वर्ग पाहता तो गांजा अफू भांग दारू यांच्या आहारी गेलेला आहे, पैशा अभावी आलेल्या नैशान्यातून मग चोरी डका खून अशा वेगवेगळ्या मार्गाचा याला मुख्य कारण हे फक्त व्यसन हे आहे. फक्त एकट्या महाराष्ट्र राज्यात जर १०,००० वरून अधिक शेतकरी आत्महत्या करीत असतील तर संपूर्ण भारतात शेतकऱ्यांची स्थिती किती दयनीय असेल हे आपल्याला कळू शकते. आणि आपले सरकार मग ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्यांनी शेतकऱ्या संबंधित काहीच विचार करू नये ही अत्यंत निंदनीय बाब आहे.

    गाडगे बाबा नी आपल्या कीर्तनातून अनिष्ट रूढी परंपरा त्या काळातील सावकारी, गांजा अफू भांग दारू य विषयी जनजागृती केली ती लोकांमधे जाऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने समजू सांगितले परंतु आता आपण ते समजून घेण्यास कमी पडत आहे याची खंत वाटते. त्यांचे कार्य हिमालया इतके उत्तुंग आहे, तर लोकसंग्रह सागरासारखा विशाल ! व्यक्तित्व चंद्रासारखे शीतल तर जनसेवेचे काम सूर्याइतके प्रखर ! कामाचा वेग वान्यासारखा सुसाट! अशा या पंचमहाभूती थोर महात्म्याचा देह पंचमहाभूतात आजच्या विलीन झाला तेव्हा उभा महाराष्ट्र हळहळला !

    गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला…..
    गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला…..
    गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला…..
    गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला…..
    गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला …..
    -कु. अश्विनी सविता हेमराज बिजेवार.
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *