अमरावती (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील, दोस्ती फाऊंडेशनच्यावतीने लोक कलावंत पैंगबरवाशी मजनू भाई शेख यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने राज्यस्तरीय उत्कृष्ठ समीक्षा लेखन पुरस्कार यंदा विदर्भातील प्रसिध्द समीक्षक साहित्यिक प्रशांत नामदेवराव ढोले यांच्या आशयघन व दर्जेदार "आंबेडकरी जाणीवांचा अक्षर प्रकाश" या समीक्षा ग्रंथास श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मा. डॉ. एस. पठाण सर (माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा उच्च शिक्षण संचालक (म. रा.)उदघाटक मा. बाबासाहेब सौदागर (चित्रपट, गीतकार ), मा. वसुंधरा शर्मा (सिने अभिनेत्री), साहित्यिक डॉ. वंदना मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, मा. रामदास वाघमारे, रज्जाक शेख, मुख्य संचालक, दोस्ती फॉउंडेशन श्रीरामपूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रशांत नामदेवराव ढोले यांना राज्यस्तरीय समीक्षा लेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
हा चौथा पुरस्कार आहेत. फलटण, जि. सातारा राज्यस्तरीय समीक्षा पुरस्कार २०२२, राजा ढाले समीक्षा पुरस्कार, नागपूर, नांदेड येथील उज्ज्वल प्रतिष्ठान आयोजित समीक्षा सौंदर्य पुरस्कार २०२२प्राप्त झालें आहेत.परिस प्रकाशन पुणे या दर्जदार प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला. प्रस्तावना ज्येष्ठ समीक्षक डॉ. अशोक पळवेकर सर यांची आहेत. पाठराखण ज्येष्ठ साहित्यिक डॉ. युवराज सोनटक्के, बंगलोर यांची आहेत. मुखपृष्ट प्रसिद्ध चित्रकार संजय ओरके सर त्यांचे आहे.
हा सम्मान मिळाल्याबद्दल संजय ओरके, अरुण विघ्ने, डॉ. भूषण रामटेके, तुंभारे साहेब (गट शिक्षण अधिकारी, देवळी पंचायत समिती ), नंदा खडसे, संजय बैस, प्रकाश बनसोड, सौ. पद्मा प्रशांत ढोले, संजय इंगले तिगांवकर,डॉ. अरविंद पाटील, जगदीश भगत, सुरेश मेश्राम, रसपाल शेंद्रे, सुरेश भिवगडे, प्रकाश जिंदे, रत्ना मनवरे, प्रीती वाडिभस्मे, सुमित्रा चांदेकर, प्रविणा मैत्रे, राजश्री शेरजे, प्रतिभा भगत, आशा नंदकुमार भस्मे, डॉ. चंदु पवार, चंदू गाडगे, दीपक गुढेकर, महेन महाजन,विजय कोंबे, गौतम पाटील,प्रवीण ढोले, अशोक मौर्य, मयुरी मसराम आई व वडील यांनी अभिनंदन केले.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या