अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व न्यायालयांसाठी सन 2023 या वर्षातील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार गणराज्य दिन (26 जानेवारी), महाशिवरात्री (18 फेब्रुवारी), धूलिवंदन (7 मार्च), गुढीपाडवा (22 मार्च), महावीर जयंती (4 एप्रिल), गुडफ्रायडे (7 एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), महाराष्ट्र दिन (1 मे), बुध्द पौर्णिमा (5 मे), बकरी ईद (29 जून), मोहरम (29 जुलै), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट), गोकुळाष्टमी/गोपाळकाला (7 सप्टेंबर), पोळा (14 सप्टेंबर), गणेश चतुर्थी (19 सप्टेंबर), महालक्ष्मी (गौरी) पूजन (22 सप्टेंबर), अनंत चतुर्दशी/ईद ए मिलाद (28 सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर), दसरा (24 ऑक्टोबर), दिवाळी (13 ते 18 नोव्हेंबर), ख्रिसमस (25 डिसेंबर) यादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, काही सण व महत्वाचे दिवस महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी आणि रविवारी येत असल्यामुळे त्यादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी), रमजान ईद (22 एप्रिल), पितृमोक्ष अमावस्या (14 ऑक्टोबर), दिवाळी लक्ष्मीपूजन (12 नोव्हेंबर) या दिवसांचा समावेश आहे.
प्रत्येक महिन्याच्या सर्व रविवारी, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सर्व न्यायालये आणि कार्यालये बंद राहतील. सर्व फौजदारी न्यायालये जाहीर केलेल्या सर्व सुटीच्या दिवशी बंद राहतील, मात्र उन्हाळी आणि हिवाळी सुटीच्या कालावधीत चालू राहतील. जिल्ह्यातील सर्व दिवाणी न्यायालये भाग 2 मध्ये जाहीर केलेल्या उन्हाळी व हिवाळी सुटीच्या कालावधीत बंद राहतील. शेट्टी व पद्मनाभन आयोगाच्या शिफारशीनुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वरील सुट्ट्या व उन्हाळी/हिवाळी रजा यात फेरबदल होऊ शकतो, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.प्र. पाटकर यांनी कळविले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या