Recent in Technology

Advertisement

Breaking News

नववर्षोत्सवानिमित्त चिखलदरा येथील वाहतूक मार्गात बदल

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून दि. 31 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदरा येथे नववर्ष उत्सव साजरा करण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर दि. 31 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 दरम्यान परतवाडा ते चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाटवळणाचा असल्याने तेथे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक खोळंबण्याची व अपघात होण्याची शक्यता असते. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये या कालावधीत वाहतूकीचे नियमन योग्य प्रकारे करता यावे, यासाठी दि. 31 डिसेंबर 2022 ला सकाळी 8 वाजेपासून दि. 1 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा हा रस्ता जाण्यासाठी तसेच चिखलदरा, घटांग मार्गे परतवाडा हा रस्त येण्यासाठी या मार्गाची वाहतूक एकमार्गी करण्यात येत आहे.

  या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code