Recent in Technology

Advertisement

Breaking News

अमरावती महानगरपालिका द्वारा संचालीत स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासीका केंद्राचे यश ३ विद्यार्थ्‍यांची विविध पदांवर निवड

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका तर्फे संचालीत स्‍पर्धा परिक्षा ग्रंथालय/अभ्‍यासिका केंद्र, गोपाल नगर, अमरावती शहरातील विद्यार्थ्‍यांकरीता दिपस्‍तंभ ठरत असल्‍याचे पुन्‍हा सिध्‍द झाले आहे. मनपाच्‍या या स्‍तुत्‍य व नाविण्‍यपुर्ण स्‍पर्धा परिक्षा ग्रंथालय/अभ्‍यासिकामुळे गौरव घनश्‍याम दंदे यांची सहा.कक्ष अधिकारी (MPSC), प्रज्‍वल जनार्दन गवई यांची स्‍टेशन मास्‍तर भारतीय रेल्‍वे चेन्‍नई व आनंद नामदेव भूजबळ यांची सी.आय.एस.एफ. कॉन्‍स्‍टेबल पदावर नियुक्‍ती झालेली आहे. या विद्यार्थ्‍यांनी सरळसेवा भरती अंतर्गत घेण्‍यात आलेल्‍या पद भरतीत यश प्राप्‍त केलेले असून त्‍यांची सहा. कक्ष अधिकारी (MPSC), स्‍टेशन मास्‍तर भारतीय रेल्‍वे चेन्‍नई व सी.आय.एस.एफ. कॉन्‍स्‍टेबल म्हणून नियुक्‍ती झालेली आहे.

    महानगरपालिका महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी पुढाकार घेवुन काही वर्षापूर्वी स्‍पर्धा परिक्षा क्षेत्रात करियर करु इच्‍छीना-या शहरातील गरीब, होतकरु विद्यार्थ्‍यांकरीता मनपाने स्‍पर्धा परिक्षा ग्रंथालय/अभ्‍यासीका केंद्रांची निर्मिती केली असून हा महाराष्‍ट्र राज्‍यातील नाविण्‍यपूर्ण उपक्रम ठरला आहे. तेव्‍हापासून शेकडो विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेवून शासकीय सेवेत विविध पदावर रुजु झालेले आहेत.

    महानगरपालिकेने हे स्‍पर्धा परिक्षा केंद्र गेल्‍या काही वर्षापासूनच सुरु केले असून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्‍या विविध स्‍पर्धा परिक्षेची तयारी करण्‍याकरीता आवश्‍यक पुस्‍तके विद्यार्थ्‍यांच्‍या मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असून इतर आवश्‍यक सोई सुविधा पुरविण्‍याकरीता मनपा विशेष प्रयत्‍न करत आहे. विद्यार्थ्‍यांना अधिकाधिक सोई पुरविण्‍याकरीता मनपा आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांचे विशेष लक्ष आहे. उपलब्‍ध क्षमतेपेक्षा विद्यार्थ्‍यांची प्रवेशाकरीता मागणी असल्‍याने शेकडो विद्यार्थी प्रतिक्षेत आहे.

    यश प्राप्‍त केलेल्‍या विद्यार्थ्‍यांचे मनपा आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी रोप देवुन अभिनंदन केले असुन या विद्यार्थ्‍यांचे यशामुळे या केंद्रावरील अन्‍य विद्यार्थ्‍यांना प्रेरणा मिळेल व अधिकाधिक यश मिळेल अशी शुभकामना व्‍यक्‍त केली. यावेळी महिला व बाल कल्‍याण अधिकारी नरेंद्र वानखडे, माजी सभागृह नेता सुनिल काळे, कर्मचारी अमोल साकुरे, श्रीधर हिवराळे, किशोर वायधने व विद्यार्थी उपस्थित होते.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code