Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

‘नवलेखक अनुदान योजनेबाबत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आवाहन’

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2023 या वर्षासाठी ज्याचे आजमितीपर्यन्त एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

  नवलेखकांना (1) कविता (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे - 80 कविता) (2) कथा (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त 45000 शब्द) (3) नाटक/ एकांकिका (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त 28000 शब्द) (4) कादंबरी (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त 45000 शब्द) (5) बालवाड्.मय (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त 28000 शब्द) (6) वैचारिक लेख/ललितलेख/चरित्र/आत्मकथन/प्रवास वर्णन (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त 45000 शब्द) या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकूराला अनुदान देण्यात येईल. (वर उल्लेखिलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही.)

  नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरूपात (टाईप केलेल्या) पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. नवलेखकांनी त्यांचे साहित्य दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 जानेवारी, 2023 या कालावधीत पुढील पत्त्यावर पाठवावे. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 दूरध्वनी :- 022-2432 5931 या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना 2023 माहितीपत्रक व अर्ज या शीर्षकाखाली तसेच What’s New या अंतर्गत Navlekhaka Grant Scheme Rules Book and Application Form या शीर्षकाखाली तसेच मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code