- * शिक्षण मंचने जाणून घेतल्या विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेदना
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : एकत्रित वेतनासाठी विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विद्यापीठाच्या परिसरात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. केंद्रीय मूल्यांकन विभागातील १०८ कर्मचाऱ्यांनी आपल्याला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित वेतन मिळावे व नैसर्गिक न्यायानुसार वेतन वाढ मिळावी या मागण्यांकरिता ८ डिसेंबर पासून अनिश्चित काळाकरिता संप पुकारला आहे.
विद्यापीठाच्या इतर विभागांप्रमाणेच परीक्षेसारख्या संवेदनशील विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी प्रशासनाने त्यांच्या हक्काची पायमल्ली न करता नैसर्गिक न्यायानुसार वेतन वाढ आणि नियमित वेतन यासारख्या अत्यंत मूलभूत स्वरूपाच्या मागण्यांचा विचार प्राधान्याने करणे गरजेचे आहे. शिक्षण मंचच्या माध्यमातून व्यवस्थापन परिषदेच्या सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळण्यासाठीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे अद्याप देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्या निर्णयाचा लाभ मिळू शकला नाही हे दुर्दैव असल्याची भाव सर्व संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेताना प्रा प्रदीप खेडकर यांनी व्यक्त केले. शिक्षण मंच खंबीरपणे सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास विद्यापीठाने नुकत्याच सुरू केलेल्या परीक्षेमध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते व त्याचा सरळ परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिक्षण मंचच्या वतीने महामहिम राज्यपाल व विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांच्याकडे केली आहे.
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या