आजवरच्या इतिहासात आत्तापर्यंत कित्येक महात्मे जन्माला आले आणि आपल्या अनमोल कार्याने अजरामर झाले. एका कनिष्ठ जातीत जन्माला येऊनही खऱ्या अर्थाने विश्वरत्न म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. असं एकमेव व्यक्तिमव कि ज्यांचे पूर्ण विश्वात पुतळे उभारले गेले आहेत. माणसाला कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार नसला तरी मिळालेल्या जन्माचे आपल्या कार्याने सोने करणे महत्त्वाचे असते. सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून आजही पूर्ण जगात भारताची राज्यघटना आदराने संबोधिली दिली जाते.
आत्ता दीप भव या बुद्धांच्या शिकवणी प्रमाणे बाबासाहेब स्वतःच स्वतःचा प्रकाश झाले आणि आपल्या अनुयायांनाही त्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवला.सर्व जाती धर्मांचा विचार करून अतिशय अभ्यासपूर्ण अशी राज्यघटना बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तयार केली.त्यात त्यांनी दूरदृष्टीही ठेवली होती.स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी आपल्या पदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आणि आपल्या फायद्यासाठी काहीही तडजोड करणारे आत्ताचे राजकारणी पाहिले तर किव येते.
'शिका संघर्ष करा, संघटित व्हा' हा मूलमंत्र बाबासाहेबांनी आपल्याला दिला. तो आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे.'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे' 'ते जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' हे बाबासाहेबांचे विचार म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे. आजच्या काळात भोवताली जी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसात माणूस राहिलेला नाही. धार्मिक वातावरण गढूळ झाले आहे. अशा वेळी या सगळ्याला बदलायचा एकच मार्ग आहे,तो म्हणजे घराघरात संविधान पोहचले पाहिजे. काल, आज आणि उद्या शिक्षण हे महत्वाचेच राहणार आहे.त्याला पर्याय नाही. कारण ज्ञानाने सशक्त झालेले मस्तक सहजासहजी कुणाचे हस्तक होत नाही. आता पुन्हा गरज आहे एका नव्या प्रज्ञा सूर्याची, जो बाबासाहेबांची ज्ञानपरंपरा समर्थपणे राबविल. आज प्रज्ञासूर्य दुसरे कोणी होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपणच बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालुयात..
आजच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबाना आपण त्यांच्या मार्गावर चालू असा शब्द देऊयात. हीच खरी आदरांजली ठरेल.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या