Header Ads Widget

मुप्टा नाशिक जिल्हा शाखा अध्यक्षपदी डॉ.बागुल तर सचिवपदी डॉ.कावळे

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    नाशिक (प्रतिनिधी) : गेली २५ वर्षे शिक्षणक्षेत्रातील विविध प्रश्नांवर यशस्वीपणे काम करणारी महाराष्ट्र अंडर प्रिव्हीलेज्ड टीचर असोसिएशन अर्थात मुप्टा संघटनेची सभा नाशिक येथे गुरुवार दि.२२ डिसें. २०२२ रोजी उत्साहात संपन्न झाली.

    या सभेला मोठ्या संख्येने नाशिक येथील अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. सभेला मुप्टा संघटनेचे संस्थापक सचिव मा. सुनील मगरे (औरंगाबाद)यांनी मार्गदर्शन केले. सांप्रतकाळातील शिक्षण क्षेत्रातील आव्हाने, कोरोनानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती वा शिक्षणातील उदासीनता, गळती त्यावरील उपाय तसेच मुप्टा नाशिक शाखेतील संघटनवृद्धी करणे, प्राध्यापकांचे कॅस, बदल्या याबाबत विविध संस्थांचे असंवेदनशील व अन्यायकारक धोरण या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. तसेच त्याचप्रमाणे मुप्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी वाघमारे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभागाचे महेंद्र शिरसाठ, कल्पना अहिरे आणि निकाळे हे होते.

    डॉ.रवी बागुल व डॉ.लक्ष्मीकांत कावळे यांची एकमताने अनुक्रमे अध्यक्ष व सचिव म्हणून निवड करण्यात आली. प्रा. सुनील मगरे यांचे हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दोन्ही मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना नाशिक मुप्टा शाखा अधिक सक्षम करण्याचा मानस व्यक्त केला. याप्रसंगी डॉ.प्रतिभा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लवकरच नाशिक येथे मुप्टाच्या वतीने 'नवीन शैक्षणिक धोरण' या विषयावरलवकरच एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. याप्रसंगी मुप्टा उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ.व्यंकट कांबळे, भास्कर टेकाळे, डॉ.सुरेश मगरे, डॉ. सोनटक्के, डॉ. प्रकाश पगारे, डॉ.विलास कांबळे, प्रा. दुधमल, प्रा.सोनवणे व इतर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन डॉ.मीना पवार यांनी व्यक्त केले तर आभार डॉ.व्यंकट कांबळे यांनी मानले.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या