Header Ads Widget

दखनी तडका....

  कयकू करंरा राडा बे
  संबाल संसार गाडा बे
  देकके खा गन्ना जरा
  कयकू खारां वाडा बे
  लगानेका नाम नई न
  तोडते जारां झाडां बे
  हटरीच नई बिमारी ?
  पी ना कडवा काडा बे
  गिऱ्याय तो छोड ना
  जुना पुराना बाडा बे
  - -
  -डी के शेख
  8999860901

  दखनी कवी मा डी के शेख यांची नुकतीच *दखनी तडका* ही रचना वाचनात आली. अत्यंत साधी कविता मात्र मानवी जीवनाच्या स्वभावावर आणि व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर परखड भाष्य करणारी रचना आहे. अत्यंत अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारी अल्पाक्षरी दखनी तडक्याचे मी थोडक्यात केलेले रसग्रहण

  समाजात काही घटक असे असतात की ते फक्त गाजावाजा करीत असतात. स्वतः च्या कामाला मागे पण दुनियेचे धुणे धुवायला सर्वांच्या पुढे असतात. आपला स्वतःचा प्रपंच सोडून दुस-याच्या संसारात तोडं खूपसणारे भरपूर आहेत. अशा भंगारबाजांना आपूलकीचा दम देत खास दखनी शैलीत कवी म्हणतात की, कशाला नुसता आरडा ओरडा करतोस, कामधंदा तर काही करत नाहीस पण इतरांच्या संसारात उगाच ढवळाढवळ करतोस. *कशाला उगाच राडा करतोस रे, आपापला संसार गाडाच सांभाळ ना रे* असा दमच ठोकतांना ते लिहतात की-

  कयकू करंरा राडा बे
  संबाल संसार गाडा बे

  काही माणसांना हातचं चांगलं सोडून पळत्याच्या मागे धावण्याची सवय असते. आमच्याकडे एक ग्रामीण म्हण आहे *शेजीनं दिली भर आणि उठ गं म्हातारे नवरा कर* अशी काही माणसं असतात. कोणी काही सांगितलं की मागचा पुढचा कोणताही सारासार विचार न करता त्यांच्या मागे जायचे. थोडक्यात काय तर काही व्यक्ती चांगलं सोडून वाईटाच्या मागे लागतात. म्हणून कवी खास शैलीत म्हणतात *उस चांगला आहे किंवा नाही हे बघून तरी खा ना रे, उगा कशाला हावरटपणा सारखं उसाऐवजी वाढेच खातोस.* अशा भंपक लोकांना ते खसकून टाकतांना म्हणतात की,

  देकके खा गन्ना जरा
  कयकू खारां वाडा बे

  समाजात चांगले काम करावे, त्यामुळे नाव चांगले निघते. समाज आपल्याला चांगलं म्हणतो. मान सन्मान मिळतो. मात्र काही महाभाग स्वतः कडून चांगलं तर करत नाहीच पण इतरांनी केले तर त्यालाही करू देत नाहीत. त्याच्याही कामात व्यत्यय आणतो. अशा कृतघ्न लोकांना समजूतीच्या भाषेत सांगतात की, तु झाडं तर लावत नाहिस मग कशाला तोडत जातोस. जोडायचे काम कर, तोडायचे काम कशाला करतोस. यावर दखनी भाषेत फटकरतांना कवी म्हणतात की-

  लगानेका नाम नई न
  तोडते जारां झाडां बे

  जीवनात काही लोकांना वाईट खोडी लागलेल्या असतात. त्यांना काहीही समजून सांगितले तरी ते सुधरत नाहीत. त्यांची लत, खोड, वाईट सवय बदलत नाहीत. अशा बिमारीवर , अशा आजारावर आयुर्वेदात कडू काढा रामबाण उपाय आहे. तसा समाजात अशा वाईट सवयींवर कुणाकडून तरी उपदेशाचे डोस घेतले पाहिजे. अशा मानसिक विकृतांवर फटके मारतांना त्याला‌ लागतील अशा भाषेत कवी सांगतात की - अरे बाबा, तुझ्या खोडीत जर बदल होत नसतील तर कडू विचारांचे उपदेशाचे डोस तरी घे. अशा खास उपदेशासाठी कवी आपल्या दखनी तडक्यात म्हणतात की-

  हटरीच नई बिमारी ?
  पी ना कडवा काडा बे

  आपल्या अवतीभवती बरेच लोकं अशी असतात की त्यांना जून्या गोष्टीत खूप रस असतो. समाजाच्या बदलांबरोबर आपणही बदलले पाहिजे पण अशा लोकांना हे बदल मंजूर नसतात. चिखलात खितपत पडलेल्या एखाद्या मेलेल्या ढोरांसारखे ते एकाच विचारात गुंतलेले असतात. ते जूने विचार बदलत्या परिस्थितीनुसार सोडून द्यायला हवे. म्हणून कवी अशा लोकांना सबूरीचा सल्ला देतात की - वाडा पडका झालाय , पडायला आलाय तर सोडून दे, उगाच कशाला त्यात अडकून बसतोस. अशा जून्या विचारांना चिटकून बसलेल्यांना कवी म्हणतात की,

  गिऱ्याय तो छोड ना
  जुना पुराना बाडा बे

  मा डी के शेख यांच्या दखनी तडक्यातून समाजातील वाईट चालीरिती, समाजातील अनिष्ट प्रथा, कुविचारावर परखड भाष्य केलेले असते. त्यांची भाषा वरून सौम्य पण आतून गंभीर असते. शालीतून जोडे मारावे तसे फटके मारतांना दिसून येतात. दखनी भाषेतून समाजाचे निरिक्षण नोंदवत असतात. कवी डी के शेख यांना त्यांच्या पुढील दर्जेदार लेखनीसाठी हार्दिक शुभेच्छा..!

  -प्रशांत शहादू वाघ (पॅसिफिक टायगर)
  संपर्क - *तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार
  रसग्रहण आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, नावासह शेअर करा
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या