Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सरळसेवा भरतीसाठी बिंदूनामावल्यांचे काम युद्धपातळीवर मागासवर्ग कक्षातील अधिकारी- कर्मचा-यांकडून कार्यवाही

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शासनाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुमारे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षात बिंदूनामावली प्रमाणित करण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले.

    विभागातील सर्व जिल्ह्यांतील सर्व शासकीय कार्यालयांतील भरावयाच्या पदांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडे कार्यालयप्रमुखांकडून बिंदूनामावली प्रमाणित करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले. कामाची तातडी लक्षात घेऊन बिंदूनामावली प्रमाणित करण्याचे काम युध्दपातळीवर राबविण्यात आले. मागासवर्ग कक्षातील अधिकारी व कर्मचा-यांनी अहोरात्र काम करून बिंदूनामावली प्रमाणीकरणाला प्राधान्य दिल्याने भरतीच्या अनुषंगाने एक महत्वाची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, वन विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महापालिका, नगरपरिषदा, महामंडळे, महावितरण व इतर अनेक कार्यालयांतील गट क व गट ड पदांच्या बिंदुनामावली तपासून देण्यात आल्या.

    विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या मार्गदर्शनात मागासवर्ग कक्षात सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, नायब तहसीलदार संजय मूरतकर, सूजन सोळंके, रुपाली चन्ने, श्री. हातेकर, श्री.केराम, सुधीर औधकर व मंगेश साहूरकर कार्यरत आहेत.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code