Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली अभ्यासाने व अंगिकारणानेच.!

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ज्ञ, समाजशात्रज्ञ, मानववंश, तत्वज्ञान, बुद्धिझम यांचे ही गाढे अभ्यासक होते. परंतु त्यांची या विषयाची अवतरणे दिली जात नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे अवतरण, " या देशाच्या संस्कृतीची मुख्य समस्या ही बौद्धिक अप्रामाणिकता आहे. ही खरोखर आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपणास ६ डिसेंबर १९५६ ला सोडून गेले. आज ६६ वर्ष झालीत परंतु अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांपर्यंत पोहचू शकले नाहीत.

  आपण कुठल्याही महापुरुषाची जयंती व पुण्यतिथी साजरी करतो ही फक्त त्या दिवसा पुरतीच असते. साधारणतः ह्या दिवशी हार, तुरे, पुष्प व त्या महापुरुषांबद्दल गौरवोद्गार काढले जातात. ह्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचा उद्देश हा या महापुरुषांना स्मरण करणे, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविणे हाच असतो. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यांनी दिलेली शिकवण व विचार अंगीकारणे फार गरजेचे आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान हे सर्वसामान्यांचा विकास व माणसाची प्रगती हा होता. त्यांचा उद्देश मानव कल्याण व सर्वांना समानता मिळावी हा होता. परंतु आजही श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी फारच दुरावली आहे. भांडवलशाही व कामगार वर्ग ह्यात मोठी तफावत असून हा एक मोठा संघर्ष अजूनही आपणास जाणवत आहे.

  जिकडे तिकडे कंत्राटी कामगारांचे पेव फुटले आहे. सर्व कामगारांना अल्पशा वेतनावर काम करावे लागत आहे. ह्याचा शेवटी स्फोट होऊन शोषणा विरुद्धचा मोठा संघर्ष होण्याची भीती वाटत आहे. ह्या समस्येचे निवारण करावयाचे असेल तर डॉ. बाबासाहेबांना अभ्यासून त्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत व आपल्या भारतीय राज्यघटनेत जे प्रावधान आहेत ते अंगीकारणे फार गरजेचे आहे.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा सर्वांपर्यंत पोहचविणे फार गरजेचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक स्वतंत्र विचारांचे विद्यापीठ होते. हा विचार लहानांपासून थोरांपर्यंत पोहचविणे सध्याच्या काळात फार गरजेचे आहे.आजच्या शालेय ते विद्यापीठ अभ्यासक्रमाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासणे फार गरजेचे आहे. अर्थतज्ञ म्हणून रिझर्व्ह बँकेची स्थापना कशी झाली? हे सुद्धा अर्थशात्र, वाणिज्यच्या अभ्यासकांना अभ्यासणे फार गरजेचे आहे. रुपयाचे अवमूल्यन कसे होते? त्यावर सुद्धा चिंतन मंथन होणे गरजेचे आहे. कामगार चळवळी ह्या मागे पडत आहे. कामगारांचे लढे यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे? ह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी कामगार कायदे विषयक काय सूचना केल्यात? हे अभ्यासणे व अंगीकारणे फार गरजेचे आहे.

  प्रत्येक नागरिकाचा समान हक्क, समान वेतन व सन्मानाने जगणे हा अधिकार आहे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तसा न्याय आम्हास मिळवून सुद्धा दिला आहे. परंतु आज ह्या हक्काची कुठे तरी पायमल्ली तर होत नाही ना, ह्यासाठी सजग असण्याची गरज आहे. आज जर आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासले व ते अंगिकारले तर आजच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना खरी आदरांजली ठरेल.

  -अरविंद सं. मोरे
  नवीन पनवेल
  मो. ९८२०८२२८८२
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code