अमरावती (प्रतिनिधी) : आज सर्वीकडे इंटरनेटचे जाळे पसरले आहे. संपूर्ण जग हे एका छोट्याशा मोबाईलवर आले आहे. आजचा मोबाईल हा एक संगणकच असून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक छोटासा कॅमेरा असतोच. आज ‘फोटोग्राफी’तर विद्यार्थ्यांनी शिकायचीचं, परंतु व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितले तर ‘व्हिडीओग्राफी’ आणि एडीटींग शिकावी.येणाऱ्या काळात ‘व्हिडीओग्राफी’ व्यवसायाला महत्व येणार असल्याचे प्रतिपादन गांधी चौक येथील पवार डिजीटल स्टुडिओचे संचालक विवेक अरूणराव पवार यांंनी व्यक्त केले.
स्थानिक तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करतांना बोलत होते. ‘फोटोग्राफी’ विषयाचा प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रा.विलास फरकाडे, प्रा. अमित त्रिवेदी, प्रा. राजरत्न मोटघरे यांच्या मार्गदर्शनात पवार डिजीटल स्टुडिओला भेट दिली. विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष आई डॉ. कमलताई गवई, संस्थाध्यक्ष किर्ती राजेश अर्जुन, सचिव प्रा. पी.आर.एस.राव, प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय, प्रा. स्वप्रील गवई, प्रा.आकाशी सरवटकर यांनी शुभेच्छा दिल्या. विवेक पवार यांनी विद्यार्थ्यांना जून्या कॅमेरापासून तर आजच्या आधुनिक कॅमेरापर्यंतचा प्रवास कसा झाला, याविषयी सविस्तर माहिती दिली. १९४२ साली स्थापन झालेल्या पवार डिजीटल स्टुडिओत पारंपारीक कॅमेरापासून ते आधुनिक कॅमेराचे कलेक्शन आहेे. त्यामध्ये व्ह्यू फाइंडर कॅमेरा, ट्विन लेंस कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाईंडर कॅमेरा, पिनहोल कॅमेरा, रेंजफाईंडर कॅमेरा, लार्ज अँण्ड मिडीअम फॉर्मेट कॅमेरा, एसएलआर कॅमेरा, डिजीटल कॅमेरा, नॉर्मल लेंस, पोट्रेट लेंस, वाईड अँगल लेंस, मिडिअम टेलिफोटो लेंस, एक्स्ट्रीम टेलिफोटो लेंस, विविध प्रकारचे लाईट्स, रिफ्लेक्टर्स, फोटो प्रिटींग मशिन, प्रेसिंग आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. विवेक पवार यांनी पारंपारिक आणि आधुनिक फोटोग्राफीची माहिती स्टुडिओमधील काही जूने-नवीन अल्बम्स दाखवून विद्यार्थ्यांना दिली.
या शैक्षणिक भेटीमध्ये पत्रकारिता व जनसंवाद विभागातील प्रथम गणेशराव इंगळे, तेजस गवळी, संघर्ष लौकरे, श्रीकांत सरगर, तपन लोथे, अमिता बेठेकर, चिन्मय सोळंके, रोहीत खाडे, शुभम रौराळे, निखिल गवई, सृजल लांजेवार, पियुष धुळे, आचल विलास ढोणे, काजल हंबर्डे, अविनाश आमटे, मयुर बहादुरे, संकेत भुसारी, प्रज्वल बेलसरे, आकाश भारसाकळे, लखन सुरतने, आदिनाथ बुरकुले, अतुल राठोड, संतोष यादव, आतिश कच्छवे, सुरज हनवते, सलमान अंसारी, सुशील गोंडाने हे सर्व उपस्थित होते.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या