घरात जून सामान चाळीत असताना ,एक खूप जुनी वही" हाती लागली. कुतुहुल म्हणून सहज वही च एक एक पान पालटत असताना त्यात किती तरी वर्ष्या पूर्वी लिहलेला कागद "दुमडून" ठेवलेला दिसला. काय असलं बरं ह्यात लिहलेल म्हणून सहज उचकला तर तो कागद नसून ती चिठ्ठी" होती. होय चिठ्ठी" होती.....!
आजच्या ह्या माध्यम क्रांतीच्या जगात वावरत असणाऱ्या तरुणांना त्या चिठ्ठीच " महत्व ही काय असणार म्हणा! पण ती, चिठ्ठी" मला किती तरी वर्षे लांब भूतकाळात काही क्षणात घेऊन गेली. किती विचार करत होतो मी" ती लिहताना! हात थरथरत होता. बोट अडखळत होती. तर काळीज जोर जोरात धडकत होत. इतकं सगळं होत असतांना मी " ती पहिली चिठ्ठी" लिहली होती. पांढऱ्या शुभ्र कागदावर जाणून बुजून लाल शाई च्या पेनाने लिहलेली ती, चिठ्ठी" म्हणजे!पहिल्या वहिल्या प्रेम प्रकरणाची साक्ष जरी असली तरी तिच्या पर्यत न पोहचल्याच शल्य मात्र मनाला आज ही जाणवत होतच.......
किती सुरेख अक्षरात लिहिलं होत मी " शब्द नव्हते तर त्या होत्या तरल, भावना. ज्या शब्दातून बोलत होत्या. ती का आवडत होती ? मला. हे आज ही जणू उलगडून सांगत होत्या. हळुवार उलगडत जाणाऱ्या त्या भावना मी" आज जस जसा वाचत होतो, तस तशी ती" आज ही अगदी तशीच डोळ्या समोर उभी रहात होती. खूप सुंदर जरी नसली ना! तरी, सोज्वळ होती ती...रेशमी नव्हते तिचे केस , वार आलं की अलगद हवे सोबत उडत असायचे. किती बोलके होते तिचे डोळे..... शब्दातून कमी आणि डोळ्यातूनच ती जास्त बोलायची. आणि माझी ही प्रीत कळी अलगद खुलायची. चंद्रा सारखा सुंदर नसेल ही चेहरा परंतु मला मात्र त्या चेहऱ्यात चंद्र जरी दिसत नसला तरी त्या चेहऱ्यांचं दर्शन झालं की काळीज सुखावून जायचं.
नागिनी सारखी नव्हती कधीच तिची चाल तरी ही ती चालताना मला आवडायची .....मोती बरसत जरी नसले म्हणून काय झालं ? परंतु ज्या वेळी ती हसायची त्या वेळी ती खूप गोड दिसायची...…..अक्षरशः वेडा पिसा होऊन जायचो मी. दिवसा ही ती माझ्या स्वप्नात असायची. भास ,आभास ह्याचे खेळ सतत सुरू असत.
आज पुन्हा त्या चिठ्ठीने तिच्या आठवणी जाग्या केल्या, निद्रिस्त होत्या सगळ्या भावना आज पुन्हा जाग्या झाल्या.कदाचित ही चिठ्ठी" तिच्या पर्यत त्याच वेळी दिली असती तर हा विचार काळजात वार "करत होता. काळ मात्र, खूप लोटला जरी असला, तरी भावना मात्र तश्याच असतात. हे जणू ही चिठ्ठी सांगत होती. कधी तरी पावसाळ्यात उगवणाऱ्या" भुछत्रा "सारख्या त्या भावना ही काळजात उगवतात. आणि आठवणींचा पाऊस बंद झाला की, त्या ही काळजातल्या काळजात जळून खाक होतात. पुन्हा नवीन एखाद्या आठवणींच्या पावसाची वाट पहात........
- -अशोक पवार
- 8652122491
- गटेवाडी पारनेर नगर
- --------------
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या