Recent in Technology

Advertisement

Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची नोंदणी सर्वांसाठी खुली पर्यटनप्रेमींनी विनामूल्य सहलीचा लाभ घ्यावा - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

  मुंबई, : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे तयार केलेले 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किट' 3, 4, 7 आणि 8 डिसेंबर 2022, या तारखेला विनामूल्य आयोजित केले आहे. या सहलीचा पर्यटन प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

  26 नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किटचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई सर्किटसाठी आयोजित केलेल्या मोफत दौऱ्यांमध्ये चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ आणि सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाईल.

  पर्यटकांना सकाळी 9 वाजता दादर शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथून, चैत्यभूमी आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल. त्यानंतर त्यांना बीआयटी चाळ क्र. 1 खोली क्र. 50/51 या ठिकाणी नेले जाईल. या सहलीची सांगता सिद्धार्थ कॉलेज, फोर्ट येथे होईल. दुपारी 2 च्या सुमारास दादरच्या गणेश मंदिराजवळ सहलीच्या सुरुवातीच्या ठिकाणी सोडण्यात येईल.

  पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले “ डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन (टूर) सर्किटची विनामूल्य सहल सर्वांसाठी खुली आहे. 3, 4, 7 आणि 8 डिसेंबर 2022 रोजी सहलीसाठी दररोज चार बसेस धावणार आहेत. प्रथम येणाऱ्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करू शकतात. मुंबईत होणाऱ्या या मोफत सहलीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.

  पर्यटनप्रेमींनी गुगल फॉर्म भरून https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeeSj6jP9mAba8zkRt8gPvGP_92TZp3_to_s5LbTxwbZ_GRFg/viewform?usp=sf_link whereas for ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच ऑफलाइन नाव नोंदणीसाठी 7738375812 विक्रम किंवा रसिका 7738375814 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

   --------------

   तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

   --------------------

   आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

   -बंडूकुमार धवणे
   संपादक गौरव प्रकाशन
   --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code