Header Ads Widget

जिल्हा वार्षिक योजनेत बालगृहाच्या इमारतीसाठी तरतूद - जिल्हाधिकारी पवनीत कौर

  * चाचा नेहरू जिल्हास्तरीय बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात
  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालविकास योजनांसाठी तीन टक्‌के निधीची तरतूद करण्यात आली आहे. यंदा या निधीतून बालगृहाची इमारत उभारण्याच्या कामाला चालना देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने चाचा नेहरू जिल्हास्तरीय बाल महोत्सवाला मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात आज शुभारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके, प्राचार्य डॉ. उदय मांजरे, महिला व बालविकास उपायुक्त सुनील शिंगणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे, मेघा महात्मे, अजय डबले आदी यावेळी उपस्थित होते.

  जिल्हाधिका-यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आणि नारळ वाढवून महोत्सवाची सुरवात झाली. महोत्सवात दि. 16 डिसेंबरपर्यंत विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यातील 14 बालगृहांतील सुमारे अडीचशे मुले-मुली या महोत्सवात सहभागी झाली आहेत.

  कोविडकाळात बालमहोत्सव होऊ शकला नाही. आता तो सुरळीत झाल्याचा मोठा आनंद आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, बालगृहातील मुलांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी, तसेच कला व सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी महोत्सवाचे आयोजन होते. त्यामुळे महोत्सवाच्या आयोजनातही बालगृहाच्या मुलांना सहभागी करून घ्यावे. त्यांना पुढाकाराची संधी मिळवून द्यावी जेणेकरून त्यांच्यात विविध गुण विकसित होतील.

  विभागामार्फत मुलांसाठी बुक बँक, टॉय बँक, इंग्रजी प्रशिक्षण असे उपक्रम यापूर्वी राबविण्यात आले. आता विभागीय महोत्सवही आयोजित करण्यात येईल, असे श्री. शिंगणे यांनी सांगितले.पुढील तीन दिवस बाळगोपाळांचा धमाल उत्सव येथे चालणार आहे. मुलांनी त्याचा आनंद लुटावा, असे आवाहन श्रीमती चेंडके यांनी केले.

  यावेळी जिल्हाधिका-यांनी बालकांशी संवाद साधला व खेळाडू विद्यार्थिनींशी हस्तांदोलन करून त्यांना प्रोत्साहन दिले. विविध बालगृहांचे संचालक, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या