Header Ads Widget

डॉ. दत्ताराम राठोड यांची शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती परिक्षेत्राचे नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकतेच पीएचडी/एमफिल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. श्री. राठोड यांनी स्वत:चे कर्तव्य सांभाळून हे यश संपादीत केले. या दिमाखदार कामगिरीबद्दल मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) अविनाश बारगळ आदींनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

    यापूर्वी डॉ. दत्ताराम राठोड यांनी वर्ष 2020 मध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून एका विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. या यशासोबत डॉ. राठोड यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तीर्ण केली आहे.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या